पुणे - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जात असल्याने आणि 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यासाठी जी असाधारण परिस्थिती असते, ती अमान्य केल्याने हे आरक्षण रद्द झाल्याचे प्राथमिक स्तरावर दिसत असल्याचे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केले आहे. आता संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर त्याचा अभ्यास करू, राज्य सरकार कुठे कमी पडले आहे हे बघू तसेच न्यायालयाने नेमक्या काय उणिवा काढल्या हे तपासून पुढील भूमिका जाहीर करू, असे कोंढरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित - अजित पवार