या देशाला हुकूमशाही पाहिजे की लोकशाही पाहिजे हे ठरवणारी निवडणूक आहे. मतदारांना आवाहन करताना राज म्हणाले, मोदी-शाह ही जोडी देशाला रसातळाला नेईल. तेव्हा मतदान करताना तुम्ही सारासार विचार करुन मतदान कराल, असे अवाहनही राज ठाकरेंनी मतदारांना केले.
आपली जात सांगणारे मोदी उणामध्ये अत्याचार झाल्यानंतर गप्प का - राज यांचा सवाल - भाजप
2019-04-18 21:18:37
2019-04-18 21:15:50
एका रात्रीत झटका आला आणि नोटाबंदी झाली. आरबीआयच्या दोन गव्हर्नरांनी राजिनामे दिले. निवडणुका आल्यानंतर चीन आणि पाकचा मुद्दा पुढे येतो. त्यावर राजकारण करण्यात येते, असे सांगत राज ठाकरे म्हणाले, सरदार पटेल यांचा पुतळा चीनकडून का बनवून घेतला? देशात पाणी, रोजगाराच्या समस्या असताना पुतळ्यावर खर्च करण्यात आला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विदेशी पाहुणे गुजरातमध्येच का?
गेल्या पाच वर्षांमध्ये विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आले त्या सर्वांना मोदींनी गुजरात दाखवला. विदेशी पाहुणे आल्यानंतर त्यांना गुजरातला नेण्यात येते. मग गुजराती व्यापारी उद्योग-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येतो, याचे उत्तर मोदींनी द्यावे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्याचा मोदींचा डाव असल्याचेही राज यावेळी म्हणाले.
रामदेव बाबांचा उद्योग एवढा कसा वाढला ?
बाबा रामदेव यांचाही उल्लेख राज यांनी केला. हा माणूस योगापुरताच बरा असल्याचा टोलाही राज ठाकरे यांनी यावेळी लगावला. बाबांचा व्यापार इतका कसा वाढला, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
2019-04-18 20:22:10
सरकारने सगळ्यांचा केसाने गळा कापला - राज ठाकरे
पुणे - अकलूजमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्यावर जातीमुळे टीका करण्यात येत असल्याचे म्हटले होते. यावर राज ठाकरे यांनी पलटवार केला आहे. आपली जात सांगणारे मोदी उणामध्ये अत्याचार झाल्यानंतर गप्प का होते असा सवाल राज यांनी मोदींना पुण्यात केला आहे.
भाजप सरकारने सगळ्यांचा केसाने गळा कापल्याचेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
राज ठाकरे म्हणाले, की पुणे हे सुंदर आणि टुमदार होते. मात्र आपल्याकडे शहराचे प्लॅनिंग नाही. त्यामुळे प्रगतीच्या नावाखाली मग शहरे बकाल होत जातात. परदेशातही शहरांची प्रगती होते. मात्र त्यानंतरही ती शहरे टुमदार राहातात. कारण त्यांच्याकडे टाऊन प्लानिंग असते. रस्त्यावर वाहने वाढतात. पार्किंगची व्यवस्था नाही. लोकसंख्या वाढते मात्र त्या तुलनेत शाळा, महाविद्यालय, रुग्णालय यांची संख्या वाढत नाही असेही ते म्हणाले. जगण्याची मुल्य जपण्याचे काम हे राज्यकर्ते, लोकप्रतिनिधींचे असते असेही ते म्हणाले. माझ्या भाषणाची क्लिप देशभर फिरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Raj Thackery LIVE in Pune
Conclusion: