ETV Bharat / city

पुण्याचा मानबिंदू शनिवार वाडा - पुण्याचा मानबिंदू शनिवार वाडा

पहिल्या बाजीरावानंतर आलेल्या पेशव्यांनी वेळोवेळी या वाड्यात बांधकाम करत वाड्याच्या सौंदर्यात अधिक भर घातली. काही काळ हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे याच वाड्यातून हलवण्यात आली होती.

Pune's Pride Shaniwar Wada
Pune's Pride Shaniwar Wada
author img

By

Published : Jan 8, 2021, 2:48 AM IST

पुणे - शनिवार वाडा ही पुणे शहराचा इतिहास सांगणारी वास्तू मानली जाते. याच शनिवार वाड्या भोवती पुणे शहराशी संबंधित अनेक ऐतिहासिक घटनांचा संदर्भ आढळून येतो. शहराची मुख्य ओळख असलेल्या या शनिवार वाड्याची निर्मिती 1736 साली पहिले बाजीराव पेशवा यांनी केली होती. त्यांनी सुरुवातीला 13 खोल्यांचा हा शनिवार वाडा बांधला होता. नंतर वेळवेळी या वाड्याच्या बांधकामात अधिक वाढ होत गेली.

शनिवार वाडा

मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेले पेशवे पुढे याच शनिवार वाडयातून कारभार चालवत होते. पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक ठरलेला हा शनिवार वाडा बांधताना सुरक्षिततेच्या दृष्टीने लक्ष देण्यात आले होते. तशीच बांधकाम रचना या वाड्यात दिसून येते. या वाड्याचा मुख्य दरवाजा हा उत्तरेला आहे, याला दिल्ली दरवाजा असे म्हणतात. तर गणेशदरवाजा, जंभळंदरवाजा, मस्तानी दरवाजा आणि खिडकी दरवाजा असे इतर चार प्रवेश दरवाजे शनिवाड्याला आहेत. पहिल्या बाजीरावानंतर आलेल्या पेशव्यांनी वेळोवेळी या वाड्यात बांधकाम करत वाड्याच्या सौंदर्यात अधिक भर घातली. काही काळ हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे याच वाड्यातून हलवण्यात आली होती.

छत्रपती शाहूंचे पंतप्रधान असलेले पेशवे स्वराज्याचा गाडा हाकत असतानाचे भगवे निशाण ते इंग्रज राजवटीतला युनियन जॅक असा प्रवास या वाड्याने अनुभवला आहे. पेशवे काळात पानिपतचे महायुद्ध, अटकेपार झेंडा, नारायण रावांचा खून, षडयंत्र अशा अनेक घटनांचा हा वाडा साक्षीदार आहे. नंतरच्या काळात इंग्रजांनी पुण्यातला कारभार पाहत असताना या वाड्याचा विविध कारणांसाठी वापर केला. 1928 मध्ये या वाड्याला मोठी आग लागली होती त्यात हा वाडा आगीच्या भक्षस्थानी पडला. सद्या वाड्याची तटबंदी दरवाजे आणि आतील काही भाग असे अवशेष शिल्लक आहेत. 1919 मध्ये या वाड्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

हेही वाचा - औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे - रामदास आठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.