पुणे - पुणेकरांना दिलासादायक बातमी आहे. पुण्यात आढळून आलेल्या पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाचे रिपोर्ट हा निगेटिव्ह ( Pune First Omicron Patient Negative ) आला आहे. पुढील काही 7 दिवस त्या रुग्णाला निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय वावरे यांनी दिली.
29 तारखेला पुण्यात सापडला होता पहिला रुग्ण -
पुणे शहरातील 47 वर्षीय पुरुषाला 29 नोव्हेंबरला कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला होता. पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळले होता. हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर या काळात फिनलंड येथे गेला होता. 29 तारखेला थोडासा त्रास झाला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविडबाधित आढळला होता. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आता 10 दिवसानंतर त्या रुग्णाची टेस्ट केली असता ती टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आणि पुढील 7 दिवस त्या रुग्णाला निरीक्षणात ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येईल.
हेही वाचा - Mumbai Mayor Death Threats : मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी
हेही वाचा - इगतपुरीतील १५ शालेय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह