पुणे - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
हेही वाचा... भाजी विक्रीसाठी वापरली जातेय 'ही' अलिशान गाडी; ७० वर्षीय आजीची अनोखी शक्कल
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षच्या निवडीची प्रक्रिया आज शनिवारी संपन्न झाली. यावेळी परिषदेचे अध्यक्षपद खेड तालुक्याला तर उपाध्यक्षपद भोर तालुक्याला देण्यात आले आहे.
हेही वाचा... 'सारथी' बचावसाठी मराठा समाज संघटना आक्रमक, पुण्यात लाक्षणिक उपोषण
पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे या दोघांची बिनविरोध झाली. काल शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर या दोघांची निवड करण्यात आली.