ETV Bharat / city

कार्टून पाहण्यास मज्जाव केल्याने १३ वर्षीय मुलाची आत्महत्या - Pune kid committed suicide over catroons

बिबवेवाडीतील सुख सागर परिसरात हा मुलगा कुटुंबियांसह राहत होता. मागील काही दिवसांपासून त्याला कार्टून पाहण्याची सवय लागली होती. तो मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कार्टून पाहत होता. त्यावेळी बातम्या पाहण्यासाठी आईने त्याला चॅनल बदलण्यास सांगितले. मात्र, तो चॅनल बदलत नसल्याने आई त्याला रागावली आणि टीव्ही बंद केला. त्यामुळे रागावून तो वर असलेल्या खोलीत गेला. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोखंडी अँगलला स्कार्फ बांधून गळफास घेतला.

Pune teenager committed suicide because parents didn't allow him to watch cartoons
कार्टून पाहण्यास अडवल्याने १३ वर्षीय मुलाची आत्महत्या..
author img

By

Published : Jun 10, 2020, 1:50 AM IST

Updated : Jun 10, 2020, 2:51 PM IST

पुणे : सतत टीव्हीवर कार्टून आणि चित्रपट पाहणाऱ्या तेरा वर्षीय मुलाला आईने टीव्ही पाहण्यास मज्जाव केल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने उचललेल्या या पावलामुळे बिबवेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कार्टून पाहण्यास मज्जाव केल्याने १३ वर्षीय मुलाची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील सुख सागर परिसरात हा मुलगा कुटुंबियांसह राहत होता. तो हुशार होता. मात्र, त्याचा स्वभाव थोडा हट्टी होता. मागील काही दिवसांपासून त्याला कार्टून पाहण्याची सवय लागली होती. तो मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कार्टून पाहत होता. त्यावेळी बातम्या पाहण्यासाठी आईने त्याला चॅनल बदलण्यास सांगितले. मात्र, तो चॅनल बदलत नसल्याने आई त्याला रागावली आणि टीव्ही बंद केला. त्यामुळे रागावून तो वर असलेल्या खोलीत गेला. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोखंडी अँगलला स्कार्फ बांधून गळफास घेतला.

दरम्यान, बराच वेळ झाला तरी मुलगा परत येत नसल्याचे पाहून त्याची लहान बहीण वर गेली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर तिने आईला बोलावले आणि मृतदेह खाली उतरवला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायंकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण लिटे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : पुण्यात भरधाव टँकरच्या धडकेत १६ वर्षीय तरुणीसह एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Last Updated : Jun 10, 2020, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.