ETV Bharat / city

Sachin Ahir criticizes Devendra Fadnavis : तुम्ही 5 वर्ष मुख्यमंत्री होते, शिवसेना बेईमान कशी? सचिन अहिर यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल - शिवसेना नेते सचिन अहिर

Sachin Ahir criticizes Devendra Fadnavis : पुण्यात आज जिल्हास्तरीय आढावा बैठकीनिमित्त ते आले असता माध्यमाशी बोलत होते. कार्यकर्त्यांमध्ये स्वभावावर निवडण्याची एक जिद्द आहे, आणि पक्षप्रमुखांनी सुद्धा स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचा आदेश दिलेला आहे, असे सचिन अहिरे ( Shivsena leader Sachin Ahir ) यांनी म्हटलं आहे

सचिन अहिर
सचिन अहिर
author img

By

Published : Jul 24, 2022, 6:50 AM IST

Updated : Jul 24, 2022, 7:09 AM IST

पुणे - 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि 25 वर्ष येथे सत्ता उपभोगली. तरीही शिवसेनेला बेईमान म्हणणे योग्य नाही. त्यांनी योग्य वेळी ( Sachin Ahir criticizes Devendra Fadnavis ) मतदारांच्या माध्यमातून उत्तर देऊ अशा शब्दात शिवसेना नेते सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

पक्षप्रमुखांचा स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचा आदेश - शिंदे गट फुटल्यानंतर शिवसेना राज्यभर मेळावे घेत आहे. पुण्यात रविवारी जिल्हास्तरीय आढावा बैठकीनिमित्त ते आले असता माध्यमाशी बोलत होते. कार्यकर्त्यांमध्ये स्वभावावर निवडण्याची एक जिद्द आहे, आणि पक्षप्रमुखांनी सुद्धा स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचा आदेश दिलेला आहे. परंतु, पुणे शहर महानगरपालिका मोठी आहे. साईडला पिंपरी- चिंचवड आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय योग्य वेळ घेता येईल. ( Sachin Ahir criticizes Devendra Fadnavis ) परंतु, आजपासून आम्ही जोमाने सर्वजण कामाला लागलेले आहोत आणि सगळ्यात जास्त जोरात काम आजपासून सुरू होणार आहे, असे सचिन अहिरे यांनी म्हटलं आहे.

सचिन अहिर

शिवसेना एकजुटीने उभी राहते- भारतीय जनता पार्टीला काळजावर दगड ठेवून मुख्यमंत्र्यांना सहन करावा लागत आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत ही तर सुरुवात आहे. आणखी काय- काय सहन करावे लागेल, याची कल्पना न केलेली, किती दिवस हे सरकार टिकेल हे बघावं लागेल. शिवसेना मात्र एकजुटीने उभी राहते आणि आजपासून आणखी जोमाने उभी राहील असेही सचिन आहेर यावेळी म्हणाले आहेत.

पुढच्या आठवड्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पुण्यात येण्याची शक्यता आहे. तसे आमचे बोलणे झाले आहे. पुण्यातल्याही अनेक लोकांचा समाचार घेण्यासाठी येणे आवश्यक आहे. पुढच्या आठवड्यात करायची आदित्य साहेब ठाकरे येतील, अशी अपेक्षा असल्याचे सचिन आहेर यांनी म्हटले आहे.

सचिन अहिर यांचे स्पष्टीकरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची सत्ता जाऊन, विधानसभेतील ( Assembly ) सेनेचे संख्याबळ ही कमी झाले आहे. परिषदेत मात्र सेनेचे संख्याबळ अधिक आहे. विधान परिषदेवर ( Legislative Council ) विरोधी पक्ष नेतेपदाचा शिवसेनेकडून ( Shiv Sena ) दावा करणार असल्याचे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिरे ( MLA Sachin Ahire ) यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले होते. शिवसेनेकडे सर्वाधिक 56 आमदार होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्याने 40 आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांच्या गटात सामील झाले. राज्यातील मविआ आघाडी सरकार यामुळे कोसळले. भाजपच्या मदतीने बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे सध्या विधानसभेत संख्याबळ कमी आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तुलनेत विधान परिषदेत सर्वाधिक 13 आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यावर शिवसेनेकडून दावा सांगण्यात आला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात मागणी करू अशी माहिती सचिन अहिरे यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते पदी कोणाची वर्णी लागेल, हे सांगण्यासाठी नकार दिला. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकी दरम्यान सोबत असलेले सहकारी वेगळ्या प्रवाहात गेल्याची खंत अहिरे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Illegal Bar In Goa : गोवा काँग्रेसचा स्मृती इराणींवर गंभीर आरोप; 'मृत व्यक्तीच्या नावावर रेस्टाँरंट'

Last Updated : Jul 24, 2022, 7:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.