पुणे - भारतीय रेल्वेकडून ( Indian Railways ) सोमवारी आजादी का अमृत महोत्सव ( azaadi ka amrutmohatsav ) साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त रेल्वेकडून ( Pune Railway ) स्वातंत्र्यसैनिकाची एक गॅलरी पुणे स्टेशन तयार केली जाणार आहे. महाराष्ट्रासह पुणे, सातारा स्टेशनवर सोमवारी याचे आयोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर स्टेशनच्या बाहेर शनिवार वाड्याची प्रतिकृती साकारणार आहे. तिथे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना बोलवून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
हेही वाचा - Monsoon Session of Parliament : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक
आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त रेल्वे इमारतीला डेकोरेशन केले जाणार आहे. आठवडाभर वेगवेगळे डिजिटल बोर्ड ईमारती बाहेर लावले जाणार आहेत. यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास, त्यांच्याविषयीआठवण, त्यातून साकारला जाणार आहे. त्याशिवाय धावणाऱ्या रेल्वेमध्येसुद्धा स्वातंत्र्यसैनिकांना हायलाईट केले जाणार आहे . त्याचबरोबर आजादीच्या अमृत लोगो रेल्वेमध्ये डिजिटल बोर्डावरती प्रसिद्धी करण्यात येणार आहे.