पुणे - कोरोनामुळे विविध क्षेत्रात आता ऑनलाईन चॅटिंग,मिटिंग,वेबिनार सुरु झालेत. मग पोलीस तरी कसे मागे राहतील. पुणे पोलिसांनी राज्यात पहिल्यादांत तडीपार गुन्हेगारांचा मागोवा घेण्याकरता एक्स्ट्रा अॅप तयार केले असून त्यांना याचा फायदा ही होत असल्याची माहिती पोलीस सह आयुक्त बच्चन सिंह यांनी दिली.
पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक गुन्हेगार सातत्याने विविध गुन्हे करत असतात. तर अशा गुन्हेगारांना तडीपार केले जाते. तडीपार केलेल्या गुन्हेगारांना पुर्वी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागत होती. पण सध्याच्या कोरोनाच्या या परिस्थितीत कोरोनाचे संक्रमण होऊ नये. याकरता पुणे पोलिसांनी एक्स्ट्रा हे अॅपलीकेशन तयार केले असून यामध्ये तडीपार केलेल्या गुन्हेगारांनी आपला सेल्फी सदरच्या पोलीस स्टेशनमधील अधिकारी जेव्हा सांगतील तेव्हा पाठवावा लागतो. हे अॅपलीकेशन हे त्या गुन्हेगारांच्या मोबाईलमध्ये देण्यात आले आहे. एखादा गुन्हेगार जर हद्दीत आला तर या अॅपलीकेशनमध्ये रेडअलर्ट येतो. यामुळे त्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला जातो. सध्या एक गुन्हा दाखल झाला असून अजुन अकरा गुन्हे प्रलंबित आहेत, अशी माहिती पोलीस सह आयुक्त बच्चन सिंह यांनी दिली.