पुणे- पुण्यात गणपती पाहायला बाहेर पडणाऱ्यांना गणेश भक्तांना आता नियमांचे पालन करावे लागणार आहे. पुणे शहरात रात्री 10 नंतर संचारबंदी कायम असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. यावर पोलिसांनी तोडगा काढत नियम मोडणाऱ्यांना उठाबशाचा प्रसाद द्यायला सुरुवात केली आहे. मानाचा पहिला कसबा गणपतीसमोर असेच विनाकारण बाहेर पडलेल्या तरुणांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यात रात्री उशिरा गणपती बघायला बाहेर पडताय...थांबा हे पहा चक्क 200 उठाबश्यांचा प्रसाद -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सध्या रात्री 10 नंतर संचारबंदी कायम आहे. परंतु, नागरिक मात्र या नियमांचे पालन करताना दिसत नाही. पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने वारंवार सांगूनही मानाचे गणपतींच्या दर्शनासाठी नागरिक पेठेत गर्दी करत आहेत. कोरोना संसर्गाची भीती न बाळगता नागरिक सर्सास नियामांचे उल्लंघन करत आहे. पण, पुणे पोलीस अशा नागरिकांवर आता कार्यवाही न करता सरळ उठाबशा काढण्याची शिक्षा देत आहे. अश्याच टवाळगिरी करणाऱ्या काही युवकांना पोलिसांनी चक्क 200 उठाबश्यांचा प्रसाद दिला आहे.पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात सुरुवातीच्या 5 दिवस नागरिकांनी सहकार्य केले. पण आत्ता गर्दी वाढत आहे. त्याअनुषंगाने शहरातील मध्यवस्तीमधील रस्ते रात्री बंद करण्यात आली आहे. जे कोणी टवाळखोरी करत रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरत असलेल्या लोकांवर अश्याच पद्धतीने कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.हेही वाचा -
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना कोणताही त्रास नाही - मंत्री छगन भुजबळहेही वाचा - मोदीजी त्यांच्या वाढदिवसाला पेट्रोल-डिझेल स्वस्त करून 'बर्थडे गिफ्ट' देतील - संजय राऊत