पुणे : दिवाळीत (On Diwali Celebration announced) आतीषबाजीसाठी पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर (Pune police rules for bursting firecrackers) केली आहे. तर फटाके विक्री दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात फटाका विक्री दुकाने थाटण्यात आली आहेत. तर,फटाका विक्री स्टाॅल परिसरात आतीषबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे. Diwali Celebration
महाराष्ट्र शस्त्र अधिनियमाद्वारे कागदात स्फोटक पदार्थ ठेवलेले फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या फटाकांच्या विक्रीस मनाई करण्यात आली आहे. दसरा, दिवाळी तसेच अन्य महत्वाच्या सणांच्या निमित्ताने फटाके फोडले जातात. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळीत १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे फटाके फोडण्यास; तसेच आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीस मनाई करण्यात आली आहे.साखळी फटाक्यांच्या आवाजावर मर्यादा आहे. आवाजाची मर्यादा १०५ ते ११५ डिसेबलपर्यंत असावी.
ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत मनाई करण्यात आली आहे. मात्र, जे फटाके विविध रंग निर्माण करतात. आवाज करत नाहीत, असे फटाके रात्री दहा वाजल्यानंतर फोडण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबत केंद्र शासन; तसेच राज्य शासनाने आदेश दिले आहेत. या आदेशाचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. Diwali Celebration