पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी पोलिस स्थानकात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या राम गोमारे यांनी आयर्नमॅन किताब पटकावला आहे. कझाकीस्थान इथं झालेल्या स्पर्धेत हे घवघवीत यश मिळवलं आहे. Pune Police अत्यंत खडतर असलेल्या या स्पर्धेत गोमारे यांनी 1 तास 36 मिनिटं स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलींग 5 तास 40 मिनिटे तर मॅरेथॉन रनिंग 4 तास 15 मिनिटं असे एकुण 11 तास 50 मिनिटात ही स्पर्धा पार पडली आहे.
आयर्नमन हा मानाचा किताब पटकावला पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांनी आयर्नमन हा मानाचा 'किताब' पटकावला आहे. सातासमुद्रापार कझाकीस्थान येथे झालेल्या स्पर्धेत हे घवघवीत यश मिळवलंय. Pimpri Chinchwad Police अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून राम गोमारे यांनी 11 तास 50 मिनिटात स्विमिंग, सायकलींग आणि धावून ही स्पर्धा पार केली. कमीत कमी 16 तास 30 मिनिटांत ही स्पर्धा पार करावी लागते. मात्र, या पोलीस अधिकाऱ्याने नेत्रदीपक कामगिरी करत 11 तास 50 मिनिटात बाजी मारली आहे.
पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांची प्रेरणा गोमारे म्हणाले की, तरुणांनी वेळात वेळ काढून दिवसातून 1 तास व्यायाम करायला हवा. पिंपरी चिंचवड चे तत्कालीन पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांची प्रेरणा घेऊन स्पर्धेसाठी तयारी केली. त्यांच मोलाच मार्गदर्शन लाभले अस गोमारे यांनी सांगितले आहे. स्पर्धा जिंकून आल्यानंतर राम यांनी त्यांच्या आईच्या गळ्यात मेडल घातलं. पत्नीची आणि मित्रांची देखील मोलाची साथ होती अस ते सांगतात. Pimpri Chinchwad Police स्पर्धेत बाजी मारून त्यांनी फिटनेस संदेश दिला आहे. पुढील उद्दिष्ट अल्ट्रा आयर्नमॅनच असल्याचे राम गोमारे यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षभरापासून करत असलेल्या कष्ठाच फळ सहायक पोलीस निरीक्षक गोमारे यांनी मिळालं असून आता लक्ष अल्ट्रा आयर्मनमॅन असणार आहे.