पुणे - बिबेवाडी परिसरातील लकडे बाईची चाळ ( 5 Year Old Child Kidnap In Pune ) इथून काल रात्री ७.१५च्या सुमारास एका ५ वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. पुणे पोलीसांनी अवघ्या तीन तासात सापळा रचून आरोपीला अटक केली आणि मुलाला सुखरूप त्याच्या परिवाराकडे सोपवले.
काय आहे प्रकरण -
ज्योती धनराज साळुंखे या बिबेवाडीतील पवन नगर या भागात वास्तव्यास आहेत. त्यांची आरोपी स्वप्नील रमेश शिंदे याच्याशी जुनीच ओळख आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून नीरजने या मुलाचे अपहरण करून त्याला ठार करण्याचा प्लॅन केला. मात्र, त्याचा हा प्लॅन फसला. नीरज काल खेळत असताना आरोपीने दुपारपासून त्याच्यावर पाळत ठेवून त्याचे अपहरण केले. मुलगा कुठेच सापडत नाही, हे पाहून नीरजच्या आईने बीबेवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीची लागलीच दखल घेत बिबेवाडी पोलिसांनी लागलीच तपास सुरू केला. त्याचवेळी काकडे वस्ती या परिसरात आरोपी रिक्षामध्ये एका लहान मुलासह बसलेला आढळून आला आणि लागलीच त्या आरोपीला ताब्यात घेऊन आरोपीला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.
हेही वाचा - Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणीतील साक्षीदाराने फिरवली साक्ष; एटीएसवरच केले खळबळजनक आरोप