ETV Bharat / city

माझ्या भाषेत सांगायचे तर हे छा-छु काम आहे, अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना सुनावले - police comm amithabh gupta

आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा उद्घाटन कार्यक्रम पार पडला त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामावरून पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडसावले आहे.

अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना सुनावले
अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना सुनावले
author img

By

Published : Jun 11, 2021, 9:05 AM IST

Updated : Jun 11, 2021, 12:09 PM IST

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते असल्याचे याआधी आपण अनेकदा पाहिलं ऐकलं असेल. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा पुणे पोलिसांना आला आहे. पोलीस मुख्यालयातील इमारतीचे नुतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. परंतु या नुतनीकरणाच्या कामावरून अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना चांगलेच सुनावले.

अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना सुनावले
अजित पवार म्हणाले, "अशा कामाच्या पाहणीसाठी मला बोलवले तर मी फार बारकाईने बघत असतो" माझ्या भाषेतच सांगायचं तर हे "छा-छु काम" आहे. या ठेकेदाराने पोलिसांचेच काम असे केले असेल तर बाकीच्यांचे काय? अस म्हणत पोलीस आयुक्तांसह उपस्थित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला सुनावले. शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालयाच्या इमारतीची डागडुजी करण्यात आली. या कामाची पाहणी करण्यासाठी अजित पवार आज सकाळी पोलीस मुख्यालयात आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते कोरोना काळात योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आला.
पोलीस मुख्यालयातील इमारतीचे नूतनीकरण
सकाळी साडेसात वाजताच पवार मुख्यालयात-आलेल्या अजित पवार यांनी इमारतीच्या नुतनीकरणाची पाहणी करताना अनेक चूका पोलिसांच्या लक्षात आणून दिल्या. ठेकेदाराचे कुठे चुकले आणि नेमके काय झाले हे त्यांनी वरिष्ठ पोलिसांच्या लक्षात आणून दिले. अशा कामाच्या पाहणीसाठी मला बोलवले तर मी खूप बारकाईने बघतो, माझ्या भाषेत बोलायचं तर हे काम छा-छु काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचेच काम असे केले असेल तर मग बाकीच्यांचे काय ? आमच्या बारामतीत येऊन बघा काम कशी असतात ते. अजित पवारांच्या या पवित्र्याने उपस्थित कर्मचारी मात्र अचंबित झाले.

Last Updated : Jun 11, 2021, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.