ETV Bharat / city

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अमित लुंकड अटकेत - अमित लुंकडची न्यायालयीन कोठडीत रवानगी

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अमित लुंकड यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक त्यांनी केली होती.

अमित लुंकड अटकेत
अमित लुंकड अटकेत
author img

By

Published : Jun 23, 2021, 2:06 PM IST

पुणे - गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बिल्डरवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्यामुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमित लुंकड हे पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आहेत. लुंकड रियालिटी फर्मचे ते प्रमुख आहेत. याप्रकरणी संजय विलास होनराव (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंतवलेली मुद्दल रक्कमही परत नाही केली

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी संजय होनराव यांनी 2019 मध्ये अमित लुंकड यांच्या लुंकड रियालिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये प्रति महिना पंधरा टक्के व्याजदर मिळेल या बोलीवर तब्बल 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु लुंकड रियालिटी फर्म कडून होनराव यांना पंधरा टक्के परतावा न देता त्यांनी गुंतवलेली मुद्दल रक्कमही परत केली नाही. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत सोमवारी रात्री अमित लुंकड यांना अटक केली. दरम्यान अटक केल्यानंतर अमित लोखंडे यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - लाच घेताना महिला जेलरला रंगेहात पकडले; जेलमध्ये सुविधा पुरविण्यासाठी मागितले होते चार हजार रुपये

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.