ETV Bharat / city

तब्बल 24 तास चालली पुण्यातील विसर्जन मिरवणूक; साडेसात हजार पोलीस बंदोबस्तात मिरवणूक निर्विघ्न पार - गणेश विसर्जन मिरवणूक pune news

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली आहे. तब्बल 24 तास चाललेली विसर्जन मिरवणूक गेल्या वर्षी पेक्षा 2 तास कमी वेळात पूर्ण झाली आहे.

तब्बल 24 तास चालली पुण्यातील विसर्जन मिरवणूक
author img

By

Published : Sep 13, 2019, 4:26 PM IST

पुणे - शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली आहे. तब्बल 24 तास चाललेली ही विसर्जन मिरवणूक गेल्या वर्षी पेक्षा 2 तास कमी वेळात पूर्ण झाली आहे. या मिरवणुकीतला शेवटचा गणपती शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता अलका चौकातून विसर्जन मिरवणूक घाटाकडे रवाना झाला होता.

तब्बल 24 तास चालली पुण्यातील विसर्जन मिरवणूक; साडेसात हजार पोलीस बंदोबस्तात मिरवणूक निर्विघ्न पार

मानाच्या पाच गणपती बरोबरच पुणेकरांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ आणि भाऊ रंगारी या गणपतींचे एक विशेष आकर्षण असते. रात्री अडीच वाजता दगडूशेठ गणपतीची मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर सकाळी सात वाजता ही मिरवणूक अलका चौकात दाखल झाली. पांचाळेश्वर घाटावर सात वाजून 40 मिनिटांनी गणपती बाप्पाचे विसर्जन पार पडले.

हेही वाचा... गणेश विसर्जन : तब्बल २२ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा अरबी समुद्रात विसावला

भाऊ रंगारी गणपती पहाटे साडे पाच वाजता अलका चौकात दाखल झाला होता. त्यानंतर साधारण सात वाजता या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

पुण्यातील मानाच्या गणपतीच्या विसर्जनाची वेळ

  1. कसबा गणपती - 4.30 वाजता
  2. तांबडी जोगेश्वरी - 4.50 वाजता
  3. गुरुजी तालीम - 5.50 वाजता
  4. तुळशीबाग गणपती - 6.05 वाजता
  5. केसरीवाडा गणपती - 6.30 वाजता

हेही वाचा... शहरात विविध ठिकाणी ९ जणांना वाचवण्यात अग्निशामक दलाला यश

पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी या विसर्जन मिरवणुकीचे एक महिन्यापासून नियोजन केल्याचे सांगितले. या नियोजनाची योग्य अमलबजावणी झाली, त्यामुळेच विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडल्याचे त्यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीसाठी साडेसात हजारांपेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतरही बंदोबस्त तैनात होता.

हेही वाचा... पिंपरी-चिंचवडमध्ये 28 हजार मूर्तीदान; रात्री उशिरापर्यंत होणार ५० हजार मूर्तीदान

विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई...

विसर्जन मिरवणुकीत पन्नास पाकीटमारांस ताब्यात घेण्यात आले आहे. या पाकीटमारांकडून 68 मोबाईल जप्त केले आहेत तर 401 गुन्हेगार प्रवृत्तींच्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटीस बजावून कारवाई केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

Intro:24 तास चालली पुण्याची विसर्जन मिरवणूक गेल्या वर्षी पेक्षा 2 तास कमी वेळात पूर्णBody:mh_pun_01_visarjan_miravnuk_all_end_pkg_7201348

anchor
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. 24 तास चालले लल्या या मिरवणुकीतला शेवटचा गणपती शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता अलका चौकातून विसर्जन मिरवणूक घाटाकडे रवाना झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन तास कमी वेळेत विसर्जन मिरवणूक पूर्ण झाली .

पुण्यातील मानाच्या गणपतीच्या विसर्जनाची वेळ

१) कसबा गणपती - 4.30 वाजता

२) तांबडी जोगेश्वरी - 4.50 वाजता

३) गुरुजी तालीम - 5.50 वाजता

४) तुळशीबाग गणपती - 6.05 वाजता

५) केसरीवाडा गणपती - 6.30 वाजता

या मानाच्या पाच गणपती बरोबरच पुणेकरांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ आणि भाऊ रंगारी या गणपतींचे एक विशेष आकर्षण असते. रात्री अडीच वाजता दगडूशेठ गणपतीची मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर सकाळी सात वाजता ही मिरवणूक अलका चौकात दाखल झाली. पांचाळेश्वर घाटावर सात वाजून 40 मिनिटांनी गणपती विसर्जन पार पडलं.
भाऊ रंगारी गणपती पहाटे 5:34 वाजता अलका चौकात दाखल झाला होता. त्यानंतर साधारण सात वाजता या गणपतीचं विसर्जन करण्यात आले...
पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी या विसर्जन मिरवणुकीचं एक महिन्यापासून नियोजन केल्याचे सांगितले. या नियोजनाची योग्य अमलबजावणी झाली त्यामुळे विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडल्याचे त्यांनी सांगितले.या विसर्जन मिरवणुकीसाठी साडेसात हजारांपेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त तैनात केला होता त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतरही बंदोबस्त ठिकाणी तैनात होता.
तर विसर्जन मिरवणुकीत पन्नास पाकीटमारांस ताब्यात घेतलंय. या पाकीट मारकडून 68 मोबाईल जप्ती केलेत. तर 401 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटीस बजावून कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर काही ठिकाणी डीजेचे मिक्सरही उतरवण्यात आले आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.