पुणे - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे महापालिका हद्दीतील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ( Pune 15 to 18 Age Group Vaccination ) कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेच्यावतीने ( PMC planning for Children Vaccination ) नियोजन करण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांची संख्या, एकाच वेळी होणारी गर्दी आणि ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता लसीकरण केंद्रांची ( Vaccination Center Increased In Pune ) संख्या ५ वरून ४० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण वेळेत, वेगाने आणि सुकर करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याला निश्चितच यश येईल, हा विश्वास वाटतो, अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
शहरात पहिल्या टप्प्यात 40 स्वतंत्र लसीकरण केंद्रे -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज पुणे महापालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. नवीन लाभार्थी वयोगटासाठी कोवॅक्सिन लस देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या दृष्टीने लशीचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात येत आहे. शहरातील सर्व भागातील लाभार्थ्यांना लस घेता यावी, यासाठी शहरात पहिल्या टप्प्यात 40 स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.
आजपासून लसीकरण नोंदणी करता येणार -
२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र ठरले असून लाभार्थ्यांना नव्या वर्षाच्या पाहिल्याच दिवशी लसीकरण नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे कोविन हे पोर्टल किंवा एप्लिकेशन वापरावे लागणार आहे. यात ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. शिवाय लसीकरणाला येताना लाभार्थ्यांकडे आधारकार्ड /ओळखपत्र आवश्यक असणार आहे.
लसीकरणासाठी सुरू होणारी स्वतंत्र केंद्रे -
- दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना, महंमदवाडी, हडपसर
- कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
- जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड
- राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा
- मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द
- तसेच शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयातील महापालिकेच्या रुग्णालयात लस देण्यात येणार आहे.
हेही वाचा- निर्बंध कडक करण्यात येतील, पण लॉकडाऊनची शक्यता नाही - उर्जा मंत्री नितीन राऊत