पुणे - महामेट्रोकडून पिंपरी चिंचवड स्वारगेट या 16 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. त्यात रेंजहिल्स (कृषी महाविद्यालय मैदान) ते स्वारगेट दरम्यान 6 किलोमीटरचा मार्ग हा भुयारी आहे. या मार्गात अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या मुठा नदीच्या पात्राचा भुयारी महामेट्रोने अवघ्या दीड महिन्यात यशस्वीरित्या पूर्ण केला असून आता ही खुदाई फडके हौद स्थानकाच्या दिशेने सुरू आहे.
भुयारी मार्गाचे काम जलद गतीने सुरू -
महामेट्रोकडून स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महापालिका भवन या दरम्यान भुयारी मार्गाचे खोदकाम वेगाने सुरू असून त्यातील महत्त्वाचा टप्पा असलेले मुठा नदीपात्र टीबीएम मशिनने ओलांडले आहे. न्यायालयापासून सुरू झालेला हा बोगदा येत्या दोन ते तीन महिन्यात कसबा पेठेतील दादोजी कोंडदेव शाळा येथील मेट्रो स्थानकाजवळ पोहोचणार आहे. कृषी महाविद्यालयाच्या रेंजहिल्स जवळील मैदानापासून या भुयारी मार्गाच्या खोदकामाला प्रारंभ झाला आहे. तेथून शिवाजीनगर बसस्थानक आणि पुढे न्यायालयापर्यंत सुमारे 1600 मीटर लांबीचे दोन बोगदे तयार झाले आहेत.
पुणे मेट्रोतर्फे नदीकाठचा खडतर भुयारी मार्ग पूर्ण.. टीबीएम मशिनने ओलांडले मुठा नदीपात्र
महामेट्रोकडून स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महापालिका भवन या दरम्यान भुयारी मार्गाचे खोदकाम वेगाने सुरू असून त्यातील महत्त्वाचा टप्पा असलेले मुठा नदीपात्र टीबीएम मशिनने ओलांडले आहे. न्यायालयापासून सुरू झालेला हा बोगदा येत्या दोन ते तीन महिन्यात कसबा पेठेतील दादोजी कोंडदेव शाळा येथील मेट्रो स्थानकाजवळ पोहोचणार आहे.