पुुणे - शहरात शनिवारी दिवसभरात 4 हजार 953 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर 4 हजार 389 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाबाधीत 61 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात 15 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. तसेच ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 5 हजार 473 इतकी झाली आहे. शहरात सध्या 1 हजार 14 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 25 हजार 504 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे. आता पर्यत 3 लाख 22 हजार 992 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 2 लाख 66 हजार 809 नागरिक बरे झाले आहेत.
शहरात जवळपास सर्वच भागात मायक्रो कंटेनमेंट करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग सर्वदूर असल्याने ठिकठिकाणी सोसायट्या, अपार्टमेंट मध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. शहरातील कोविड रुग्णालयांची स्थिती पाहिली तर सरकारी, महानगरपालिकेचे आणि खासगी असे एकूण 100 रुग्णालये कोवीडसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व रुग्णालयात 20 हजार 153 इतके बेड उपलब्ध आहेत. त्यातील केवळ 3 हजार 429 बेड शिल्लक आहेत.
एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही
शहरात 1 हजार 21 आईसीयू व्हेंटिलेटर बेड आहेत. मात्र सद्या एकही बेड खाली नाही. तसेच 8 हजार 885 ऑक्सिजन बेड पैकी 750 बेड शिल्लक आहेत. शहरात सध्या लॉकडाऊन असून या काळात सुरू राहणाऱ्या अत्यावश्यक सेवा मध्ये मेडिकल, दूध विक्री, हॉटेल खानावळीतील पार्सल सेवा सुरू राहणार आहे.