पुणे - पुण्यातील जम्बो कोविड सेंटर मधील सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. गेली दोन महिने अनेक कर्मचाऱ्यांचे पगार थकवून सेंटर प्रशासन कर्मचाऱ्यांना दमदाटी करत असल्याचा प्रकार होत असल्याचे जम्बो सेंटर मधील कर्मचारी सांगत आहे.
पुण्यातील जम्बो रुग्णालय सुरू झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. सुरवातीला कोविड रुग्णांची गैरसोय, त्यानंतर पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यूप्रकरण आणि व्यवस्थापनात बदल, अशा अनेक प्रकरणात जम्बो रुग्णालय चर्चेत आल्यानंतर आता कर्मचाऱ्यांचे पगारच देत नसल्याच्या तक्रारी येथील कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे जम्बो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पगार होत नसल्याने मनसेकडे दाद मागितली होती. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जम्बो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भेट घेण्यात आली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी दोन महिने पगारच होत नसल्याची तक्रार केली आहे.