पुणे - आजच्या आधुनिक युगात कोणतीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. प्रत्येक क्षेत्रात आज नवनवीन रिसर्च केले जात आहे. अश्यातच पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका कंपनीने माणसाला घेऊन उडणारा ड्रोन तयार केला आहे, आणि त्याची यशस्वी चाचणी देखील केली आहे. ड्रोन नावाच्या प्रकारामुळे अवकाशातून जमिनीवरची कोणतीही गोष्ट माणूस शूट करू शकतो. आतापर्यंत ड्रोनच्या माध्यमातून शेतीत फवारणी केल्याचे आपण पाहिल आहे. ड्रोन मधील नवनवीन वर्जन देखील पाहिले आहे. पण माणसाला घेऊन उडणारा ड्रोन हे पहिल्यांदा तयार झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चाचणी - पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमधील सागर डिफेन्स इंजिनिअरींग कंपनीकडून हा ड्रोन तयार करण्यात आला आहे. पुण्यात या ड्रोनची यशस्वी चाचणी झाली. आता या ड्रोनने माणसाचे उड्डाण करता येणार असून या ड्रोनची पहिली चाचणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घेण्यात आली होती. हा ड्रोनमध्ये 130 किलो इतके वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच ड्रोनच्या माध्यमातून माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे सहज शक्य आहे. तसेच संकटाच्या किंवा मेडिकल एमर्जन्सीमध्ये देखील या ड्रोनचा उपयोग केला जाऊ शकतो. हा ड्रोन 25 किमी पर्यंत घेऊन जाऊ शकतो.
सागर डिफेन्स इंजिनिअरींग कंपनीने ड्रोन तयार केला - या ड्रोनची उड्डाण वेळ 25 ते 33 मिनिटे इतकी आहे. चाकण औद्योगिक वसहतीमध्ये असणाऱ्या सागर डिफेन्स इंजिनिअरींग कंपनीने हा ड्रोन तयार केला आहे. कंपनीच्या इंजिनीअर्सनी चार वर्षाच्या अथक मेहनतीतून हा ड्रोन तयार केला आहे. खास भारतीय सैन्य दलाच्या मदतीसाठी हा ड्रोन तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्याला ड्रोन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अश्या या ड्रोनमुळे नक्कीच येणाऱ्या काळात मदत होणार आहे. विशेष करून आर्मिमध्ये याच चांगल्या पद्धतीने वापर करणे शक्य होणार आहे.