ETV Bharat / city

pune ganesh immersion पुण्यातील गणेश विसर्जन उत्साहात, कोणताही अनुचित प्रकार नाही -पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुण्यात 3600 गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन (pune ganesh immersion) संध्याकाळी पाच वाजता पुर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळाच्या गणपतींचे विसर्जन वेळेत पार पडले. पुण्यातील गणेश विसर्जन उत्साहात (Ganesha immersion in enthusiasm), कोणताही अनुचित प्रकार नाही अशी माहिती पुणे पोलीस आयूक्त (pune police commisioner) अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

pune ganesh immersion
पुण्यातील गणेश विसर्जन उत्साहात, कोणताही अनुचित प्रकार नाही -पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
author img

By

Published : Sep 10, 2022, 9:10 PM IST

पुणे पुण्यात 3600 गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन (pune ganesh immersion) संध्याकाळी पाच वाजता पुर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळाच्या गणपतींचे विसर्जन वेळेत पार पडले. पुण्यातील गणेश विसर्जन उत्साहात (Ganesha immersion in enthusiasm), कोणताही अनुचित प्रकार नाही अशी माहिती पुणे पोलीस आयूक्त (pune police commisioner) अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

विसर्जनादरम्यान कडेकोट बंदोबस्त संपूर्ण मिरवणुकीमध्ये 48 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. पोलीस बंदोबस्तामध्ये कुठलीही कमतरता नव्हती. तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार यावेळी घडलेला नाही. मानाच्या पाच गणपतीमध्ये थोड अंतर होतं परंतु त्याने आज काही फरक पडलेला नाही. कालच्या मिरवणुकीला थोडा उशीर झाला. पण आज वेळेतच विसर्जन करण्यात आलेले आहे. आणि शेवटचा महाराष्ट्र तरुण गणेश मंडळाचा गणपती हा पाच वाजता विसर्जन करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलेले आहे.

वाहतूक व्यवस्था सूरळीत दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेश उत्सव असल्यामुळे आणि बंदोबस्तामध्ये अनुभवी लोक थोडे कमी असल्यामुळे थोडा वेळ लागला. परंतु बंदोबस्तामध्ये कुठलीही गडबडी झाली नाही. किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. अतिशय योग्य रीतीने गणेश विसर्जन पार पडले आहे. थोड्याच वेळात आम्ही पेठेतले बॅरीकेट्स काढायला सांगितलेले आहेत. दुपारपासूनच उपनगरातले जे रस्ते आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत. आणि पुण्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आल्याचेही यावेळी पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

पुण्यातील गणेश विसर्जन उत्साहात, कोणताही अनुचित प्रकार नाही -पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप (Goodbye to beloved Bappa) देऊन पुणेकरांनी आज विसर्जन मिरवणूक आणि विसर्जन संपवले आहे. जवळपास 32 तास सात ते आठ वर्षांमध्ये एवढी लांब कधीच मिरवणूक नाही झाली. तेवढी मिरवणूक आज झाली. त्याचबरोबर दोन वर्षाच्या निर्बंधानंतर हा उत्सव करता आल्यामुळे पुण्यामध्ये फार मोठा उत्साह सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये होतात. त्यामुळे अलका चौकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गुलाल आणि गणेश मिरवणुकीमध्ये जे काही साहित्य वापरण्यात आले त्याचा कचरा आता जागोजागी पडलेला आहे.

पुण्यातील अलका चौक ते डेक्कन परिसरामध्ये सर्वात जास्त कचरा होतो. कारण, त्या ठिकाणी सर्वच गणेश मंडळ येतात. त्याच ठिकाणी विसर्जन सुद्धा होते. त्यामुळे तेथील निर्माल्य तसेच मिरवणुकीत येणारे गुलाल फुलं अशा अनेक प्रकारच्या कचरा आता अलका चौकामध्ये तयार झाला होता. तो येथील महानगरपालिकेच्या 35 कर्मचाऱ्यामार्फत साफ करण्यात येत आहे. जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल आणि पुणेकरांनाही लवकर घरी जाता येईल यासाठी हे कर्मचारी काम करताना दिसत आहेत.

गणेश विसर्जनाचा उत्साह दिवसभर संपल्यानंतर रात्री घरी जाण्याकरिता पुणेकरांनी दिली मेट्रोला पसंती. पुण्यात मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन झाल्यानंतर पुणेकर आपल्या घरी जाण्यासाठी कुठलीही वाहन व्यवस्था नसल्यामुळे पुण्यात सुरू झालेल्या पुणे मेट्रोला प्रथमच एवढा मोठा प्रतिसाद देत असून मेट्रो ने सर्व पुणेकर प्रवास करताना दिसत आहेत.

पुणेकरांचा परतीचा प्रवास मेट्रोने पुणे मेट्रो कडून रात्री एक वाजेपर्यंत मेट्रो सेवा देण्यात आली होती. पुणेकरांनी मेट्रोला उदंड प्रतिसाद दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.