पुणे : सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव Navratri 2022 सुरू असून; नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने राज्यातील नवदुर्गा आपण पाहत आहोत. आज अशीच पुण्यातील एक नवदुर्गा, जिचे नाव आहे Pune first woman driver Savita Kumbhar सविता कुंभार यांच्या संघर्षाची कथा Navratri Shaktirupaआपण पाहणार आहोत.
एखादा संकट आला की आपण खचून जातो आणि मग त्यातून कस बाहेर निघायचं याचा विचार करत असतो. पण सविता यांच्या आयुष्यात असचं एक संकट आलं आणि त्यांच्या आयुष्यचं बदलून टाकलं. पण त्या संकटाला न डगमगता त्याला तोंड देत आणि आपल्या बरोबर आपल्या मुलीचं ही आयुष्य पुढे नेऊन आज पुण्यातील पहिली महिला रिक्षाचालक कोण तर, लोक सविता कुंभार हे नाव आवर्जून घेतात. त्यांच्या संघर्षाला कशी आणि कधी सुरवात झाली जे पाहूया.
आयुष्याच्या संघर्षाला अशी झाली सुरुवात : सविता कुंभार यांचे १९९५ मध्ये संजय कुंभार यांच्याशी विवाह झाला होता. दोन वर्षांनंतर त्यांना मुलगी झाली. पती हे रिक्षा चालवत होते. छोट्या घरामध्ये सुखी संसार सुरू असताना अचानक पतीचं निधन झालं आणि सविता यांच्यांवर आभाळ कोसळलं. सारी स्वप्नं उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे खचून गेलेल्या सविता माहेरी गेल्या. वर्षभर तिथे राहिल्यावर करमाळ्यासारख्या छोट्या गावात रोजगाराच्या संधी खूप कमी असल्याचे त्यांचे लक्षात आले आणि त्या पुण्यात परत आल्या. काय करायचं काय नाही, याचा विचार सुरू केला आणि ठरवल की पतीचीच रिक्षा चालवायची आणि मग तेथून नव्या संघर्षाला सुरवात झाली.
असा होता घडतर प्रवास : नववी पर्यंत शिक्षण झालं असल्याने रिक्षाचे स्टिअरिंग हातात घेण्याशिवाय सविता यांच्याकडे पर्याय नव्हता. पण त्यावेळेस पुरुष प्रधान रिक्षा स्टँड असल्याने आपल्याला कोण काय बोलणार? कोण टीका करणार की नाही? याचा विचार न करता सविता कुंभार या रिक्षा चालवायला शिकल्या आणि मग रिक्षाचे स्टिअरिंग हातात घेत संसाराचा गाडा सुरू केला. संसाराचा गाडा तर सविता हे पतीच्या निधनानंतर पुढे नेत होत्या. पण घरात असलेल्या 4 वर्षीय मुलीचं काय? हा विचार त्यांना काही करमू देत नव्हता. अश्यातच मग मुलीला रिक्षाच्या डिकीत ठेवून त्या रिक्षा चालवण्याचे काम सविता यांनी सुरू केलं. आणि जेव्हा जेव्हा मुलीला भूक लागायची तेव्हा रिक्षा थांबायची आणि मग मुलीला दूध आणि जेवण द्यायचं. हळूहळू अशाच पद्धतीने सविता यांचे दिनक्रम तब्बल दोन वर्ष सुरू राहिला. या काळात त्यांनी चार चाकी चा प्रशिक्षण देखील घेतले आणि मग पुण्यातील एका रुग्णवाहिका मध्ये काम करायला सुरुवात केली. रुग्णवाहिकेत ड्रायव्हरचं काम करत असताना, एखादा रुग्ण तसेच मृत्यू पडलेल्या रुग्णाला बाहेरगावी घेऊन जाण्याचे काम सविता करत होत्या. एकदा तर रात्री अचानक फोन आला की कराड येथे एका मृत व्यक्तीला घेऊन जायचं आहे. पण तेव्हा मुलीला कुठे सोडणार हा विचार सविता यांना आला पण त्यावेळेस रुग्णवाहिकेतच सविता यांनी आपल्या लहान मुलीला घेऊन पुणे ते कराड प्रवास केला.
मुलीला शिक्षण देऊन केलं लग्न : काही दिवसांनी पुणे महापालिकेच्या माध्यमातून महिलांना शाळेच्या मुलांना सोडण्यासाठी चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ही एक संधी समजून त्यांनी एका स्कूल वॅन विकत घेतली. त्यानंतर त्यांनी शाळेच्या मुलांना सोडवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत त्या आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. या संघर्षमय काळात सविता यांनी स्वत:च्या मुलीला इंटेरिअर डिझाइनचं पदवीचं शिक्षण दिलं. आणि तिचं लग्न देखील करून दिलं.
50 हून अधिक पुरस्कार मिळाले : कुणाचाही आधार नसताना सविता यांनी पतीच्या निधनानंतर खचून न जाता स्वतः जिद्दीने उभ्या राहिल्या आणि त्याच जिद्दीने त्यांनी मुलीचे चांगले शिक्षण केले, तिचे लग्न केले. मुलांना शाळेत सोडत असताना अनेक पालकांना त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आणि तो आजही कायम आहे. पुण्यासारख्या नवख्या शहरात एका स्त्रीने स्वतःला सिद्ध करणे तशी खूप अवघड गोष्ट आहे. मात्र सविता कुंभार यांनी हे जिद्दीने पूर्ण केले. गेल्या पंचवीस वर्षांपासून त्या हा गाडा हाकत आहेत. त्यांच्या या संघर्षमय प्रवसाबद्दल त्यांना विविध संस्था संघटनांच्या वतीने 50 हून अधिक पुरस्कार देखील मिळाले आहेत.