ETV Bharat / city

Ajit Pawar On Pune School : पुण्यातील शाळांबाबत अजित पवार म्हणाले, "सोमवारपासून..." - ajit pawar on jumbo covid center

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घट होत ( Pune Corona Cases ) आहे. त्यामुळे सोमवार पासून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय पूर्ण वेळ सुरु राहणार आहे. याबाबात अजित पवार यांनी ( Dcm Ajit Pawar ) माहिती दिली.

v
Ajit Pawar
author img

By

Published : Feb 5, 2022, 1:12 PM IST

Updated : Feb 5, 2022, 5:21 PM IST

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घट होत ( Pune Corona Cases ) आहे. त्यामुळे सोमवार पासून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय पूर्ण वेळ सुरु राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली ( Ajit Pawar On Pune School ) आहे. विधानभवन येथे कोरोना आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यापुर्वी, मागच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आल्या होत्या. यात पहिली ते आठवी तील शाळा फक्त चार तास सुरू होती. तर नववी नंतर शाळा ही पूर्णवेळ सुरू करण्यात आली होती. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पुण्यातील कोरोना रुग्णांत घट झाली आहे. त्यामुळे सोमवार पासून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय पुर्णवेळ सुरु होतील.

अजित पवार प्रसामाध्यमांशी संवाद साधताना

दोन दिवस लसीकरण बंद

जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील लसीकरणात ग्रामीण भागात परिस्थिती चांगली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. पण या लहान मुलांच्या लसीकरणासाठी जेवढी लस उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढी लस उपलब्ध नाहीये. लस नसल्याने आज आणि उद्या लहान मुलांच लसीकरण बंद असणार आहे. जास्तीत जास्त लस कशी उपलब्ध करता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी

येरवड्यात स्लॅब कोसळून पाच जणांता मृत्यू झाला आहे. त्याबाबत बोलताना अजित पवारांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून त्या समितीचे मार्फत या घटनेची चौकशी होणार आहे. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. सरकारच्या वतीने जे पाच कामगार मृत्युमुखी पडले आहेत त्यांना पाच लाखांचा निधी देखील देण्यात आलेला आहे.

सोमय्यांनी पुरावे द्यावे

भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना जे काही आरोप करण्यात आलेले आहेत या आरोपांवर पुरावे आणून द्यावा आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. आजकाल कोणीही आरोप प्रत्यारोप करत असतो, असा टोलाही पवारांनी लगावला.

हेही वाचा - Jammu Kashmir Terrorist Encounter : श्रीनगरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

Last Updated : Feb 5, 2022, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.