पुणे - जिल्हा बँकेत ( Pune District Bank Election Result ) एकूण २१ जागा असून त्यापैकी १४ जागा या आधीच बिनविरोध निवडूण आल्या होत्या. आज एकूण ७ जागांचे निकाल आले आहेत. त्यापैकी २ जागा भाजपाने जिंकत पुणे जिल्हा बँकेत ( BJP Won PDCC ) आपले खाते उघडले आहे, तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अशोक पवार हे शिरूरमधून विजयी झाले आहेत. तर हवेलीमधून विकास दांगट, तर मुळशीमधून सुनील चांदेरे यांचा विजय झाला आहे.
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व -
गेली अनेक वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विद्यमान उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात आहे. यावर्षी देखील अजित पावर यांनी ही निवडणूक अधिकच चुरशीची केली होती. या बँकेवर खुद्द अजित पवार असतील किंवा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील बिनिरोध निवडून आले होते. त्यासोबतच राज्यमंत्री दत्ता भारणे यांचा देखील बिनविरोध विजय झाला होता. १४ बिनविरोध जागांपैकी १२ जागा या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीकडे तर २ जगांवर काँग्रेस पक्ष विजयी झाला होता. त्यामुळे आधीच पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचे वर्चस्व राहणार हे निश्चित झाले होते. आता या निकालानंतर हे स्पष्ट झाले आहे, की या बँकेवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व कायम आहे.
कोणाकडे किती जागा -
- राष्ट्रवादी काँग्रेस- 17
- कॉंग्रेस- 2
- भाजप- 2
- एकुण - 21
हेही वाचा - Lockdown In Mumbai: रुग्णसंख्या 20 हजारावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन - महापौर