ETV Bharat / city

TET Exam Paper Leak : सॉफ्टवेअर कंपनीच्या माजी संचालकाच्या घरात सापडली तब्बल २५ किलो चांदी आणि २ किलो सोनं - शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार

टीईटी पेपरफुटी प्रकरणात ( TET Exam Paper Leak ) घोटाळ्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून पोलिसांनी ३ कोटी ११ लाखांचे घबाड जप्त ( Money Seized Tukaram Supe ) केले आहे. आता जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा ( GA Software Company ) माजी संचालक असलेल्या अश्विन कुमार याच्या घरातून पुणे सायबर पोलिसांनी ( Pune Cyber Police ) २५ किलो चांदी आणि २ किलो सोनं जप्त केले ( Jewelry Seized Ashwmin Kumanr Home ) आहे.

पुणे सायबर पोलिस
पुणे सायबर पोलिस
author img

By

Published : Dec 25, 2021, 3:09 PM IST

पुणे - टीईटी पेपरफुटी प्रकरणात दरोरोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राज्य परीक्षा परिषदेचे ( Maharashtra State Council of Examination ) अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडून 3 कोटी 11 लाख आणि काही दागिने पुणे सायबर पोलिसांनी ( Pune Cyber Police ) हस्तगत केले ( Money Seized Tukaram Supe ) होते. त्यानंतर आज जी ए सॉफ्टवेअर कंपनीच्या ( GA Software Company ) माजी संचालक अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी व 2 किलो सोनं जप्त करण्यात आलं ( Jewelry Seized Ashwmin Kumanr Home ) आहे.

बेंगलोरमधून केली होती अटक

पेपरफुटी प्रकरणात अश्विनकुमार हा जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी चा संचालक डॉ. प्रितेश देशमुख बरोबर काम करत होता. आश्विन कुमार याला टीईटी पेपर फुटी प्रकरणात बेंगलोर मधून पोलिसांनी अटक केली ( Ashwin Kumar Arrested ) होती.

तुकाराम सुपेंकडून पैसे जप्त

शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी ( TET Exam Scam ) पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरावर तीन ते चार वेळेस धाड टाकली. त्यात पोलिसांनी जवळपास ३ कोटींचं घबाड जप्त केलंय. सुपेंच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. एका धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर एका व्यक्तीने दहा लाख रुपये आणून दिले. त्यापुढील धाडीत पुन्हा 25 लाख पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.