पुणे : देशातील राहण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम शहरांच्या यादीत पुण्याने पुन्हा बाजी मारत दुसरा क्रमांक मिळविला आहे. या वेळेस यादीत बंगळुरूने पुण्याला मागे टाकले असले तरी दोन्ही शहरांमध्ये अगदी काही दशांश गुणांचा फरक असल्याने पुणे बेस्टच असल्याच्या प्रतिक्रिया पुणेकरांनी दिल्या आहे. तसेच पुढच्या वेळेस पुन्हा अव्वल क्रमांक पटकावण्याचा विश्वासही पुणेकरांनी व्यक्त केला आहे. देशातील 111 शहरांमधून पुण्याने हा बहुमान मिळविला आहे.
दोन वर्षांपूर्वी पुणे प्रथम क्रमांकावर
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी देशातील राहण्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर केली. दोन वर्षांपूर्वी प्रथमच जाहीर केलेल्या राहण्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांच्या यादीत पुणे प्रथम क्रमांकावर होते. त्यानंतर या दुसऱ्या सर्व्हेक्षणातही पुण्याने बाजी मारत दुसरा क्रमांक मिळविला आहे. पुणे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये विकासकामांना गती प्राप्त होणे, शिक्षणाचा उत्तम दर्जा, आयटी सिटी, स्मार्ट सिटी अशा अनेक सुविधा पुणे शहरात आहे. त्यामुळे देशभरातील युवकांचा आणि नागरिकांचा पुण्याकडे ओढा वाढत आहे. याच्या परिमामी शहराची लोकसंख्या सातत्याने वाढतच आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे - गृहमंत्री अनिल देशमुख