पुणे - महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विकास निधीतून घेण्यात आलेल्या नऊ रुग्णवाहिकांचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला आहे. या रुग्णवाहिकांमध्ये 2 कार्डियाक रुग्णवाहिका, 2 रुग्णवाहिका आणि 5 शववाहिका आहेत. उद्घाटनप्रसंगी उपमहापौर सुनिता वाडेकर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने सभागृह नेते बीडकर, विरोधीपक्ष नेते दिपाली धुमाळ उपस्थित होते.
9 रुग्णवाहिकांचे लोकार्पण -
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य सुविधा देखील वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे शहराची रुग्णसंख्या पाहता रुग्णांना ज्या काही सुविधा मिळाल्या पाहिजे, त्या अनुषंगाने आज 9 रुग्णवाहिकांच उदघाटन करण्यात आले आहे. दुर्दैवाने शहरात कोरोनाची ही रुग्ण संख्या जर वाढत गेली तर रुग्णांना कोणतीही गैरसोय होऊ नये हे या मागचे उद्दिष्ट आहे.
नवीन 6 ऑक्सिजन प्लांट बसविणार -
मागच्या स्थायी समितीत सुद्धा पुणे महापालिकेच्यावतीने 350 कोटी हे कोरोनासाठी तरतूद केलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत कोरोनासाठी निधी पुणे महापालिका कमी पडू देणार नाही. तसेच कुठल्याही यंत्रणेत देखील कमी पडू देणार नाही. तसेच अधिकचे महापौर निधीचे पैसे देखील आम्ही यासाठी वापरत आहोत. प्राथमिक आरोग्य सेवा देण्याचे आमचे कर्तव्य असले तरीसुद्धा आम्ही संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे योग्य नियोजन करत आहोत. पुणे शहरात कुठल्याही आर्थिक विषयाने कोणतीही गोष्ट राहिली नाही. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन कमी आहे म्हणून रुग्ण रुग्णालयात घेत नसल्याचे घटना देखील शहरात घडले आहे. पुढील काळात ऑक्सिजनची कोणतीही कमतरता जाणवू नये, म्हणून पुणे महापालिकेच्यावतीने ऑक्सिजनचे 6 नवीन प्लांट बसविण्यात येणार आहे, असेही यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुणे शहरात दरोरोज अडीचशे मॅट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा लागत असतो. त्यात महापालिकेच्या रुग्णालयांना 45 मॅट्रिक टन ऑक्सिजन लागते. ही गरज पाहता एफडीएच्या नियंत्रणात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन आहे. आम्हाला बाकी कोणत्याही व्यवस्थेत काहीही कमी नाही. राज्य सरकारने रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा होऊ देऊ नये, अशी मागणी देखील यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.