ETV Bharat / city

शिर्डी संस्थानच्या निर्णयाला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा; तर तृप्ती देसाईंनी दिला इशारा

शिर्डी संस्थानने भाविकांच्या पोषाखाबाबत घेतलेल्या निर्णयाला ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

dress code diplomacy
शिर्डी संस्थानच्या निर्णयाला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा; तर तृप्ती देसाईंनी दिला इशारा
author img

By

Published : Dec 3, 2020, 4:30 PM IST

पुणे - शिर्डी संस्थानाने भाविकांच्या पोषाखाबाबत घेतलेल्या निर्णयाला ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. तसेच तृप्ती देसाईंनी शिर्डी मंदिरात लावण्यात आलेले फलक हटवण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्याला तोडीस तोड उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

शिर्डी संस्थानच्या निर्णयाला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा; तर तृप्ती देसाईंनी दिला इशारा

शिर्डी देवस्थानाने पोषाखाबद्दल घेतलेल्या निर्णयाला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा असल्याचे महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष अॅड. नीता जोशी यांनी सांगितले. देवस्थानच्या या निर्णयाबद्दल तृप्ती देसाईंना काही तक्रार असेल, तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. रस्त्यावर उतरून आंदोलन करणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या. देसाई यांनी शिर्डीत जाऊन तो फलक हटवण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्यांना तोडीस तोड उत्तर देईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोशाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानने केली आहे. यावरून आता मोठा वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संस्थानाला इशारा दिला आहे. साई संस्थानाने बोर्ड न हटवल्यास आम्ही स्वतः येऊन काढू, असा इशाराच त्यांनी दिला आहे. मंदिरातील पुजारी हे अर्धनग्न अवस्थेत असतात. ते फक्त सोवळे नेसतात. यावर कधी कोणत्या भक्ताने आक्षेप घेतले नाही. असे नमूद करत तृप्ती देसाई यांनी संस्थानाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.