पुणे - गेल्यावर्षी कोरोनामुळे दिवाळीला फटाके फोडण्यावर काहीसे बंधने घालण्यात आली होती. यंदा मात्र काही प्रमाणात बंधनात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्साहामध्ये फटके फोडले. या परिणामी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास सर्वत्र धूर दिसत होता. परिणामी शहरातील पीएम 2.5 ची पातळी दोनशेवर गेली होती. जी आरोग्यासाठी धोकादायक आहे.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी उडविले सर्वाधिक फटाके -
पुणेकरांनी सर्वाधिक फटाके लक्ष्मी पूजनाच्या दिवशी उडवले. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळली. सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याच्या वेळांवर घातलेले निर्बंध, फटाक्यांच्या प्रकारांवर घातलेली बंदी आणि सरकारी पातळीवर सुरू असलेल्या जनजागृतीमुळे गेल्या तीन वर्षांपासून फटाक्यांची मागणी घटते आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेल्याचे पाहायला मिळाले.
हवेची पातळी धोकादायक -
कोरोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हवेची पातळी धोकादायकवरून चांगली या स्थितीवर आली होती. परंतु अनलॉकनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आणि आता त्यात दिवाळीत फटाके फोडल्याने ती धोकादायक बनली आहे. पीएम 2.5 हवेची पातळी 0 ते 50 : उत्तम 50 ते 100 : समाधानकारक 100 ते 200 : धोकादायक 200 ते 300 : अत्यंत धोकादायक असते.
शिवाजीनगर : 200, कोथरूड 182, कात्रज : 150, हडपसर : 100, भूमकर चौक : 145
भोसरी : 126, पाषाण : 92
पुण्यात लक्ष्मी पूजन दिवशी फोडलेल्या फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी दोनशेवर - Pune Air Quality