पुणे: पुण्यातील खडकवासला धरणामध्ये ( Khadakwasla Dam in Pune ) मित्रांबरोबर नको ती हुल्लडबाजी करत असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने एका 18 वर्षाच्या तरुणाचा बुडून मृत्यू ( 18-year-old drowned ) झाल्याची घटना घडली. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. योगेश नवनाथ नवले असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर हवेली पोलिस आणि अग्निशमन दलाला योगेशचा मृतदेह पाण्यातून शोधून काढण्यात यश आले आहे.
नेमक काय घडलं - मूळचा अहमदनगरचा असलेला योगेश हा कामासाठी पुण्यात आला होता. योगेश पुण्यातील रविवार पेठ ( Raviwar Peth in Pune ) मधील एका दुकानात कामाला होता. आज रविवारची सुट्टी असल्याने योगेश त्याच्या इतर चार मित्रांसोबत खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेला होता. योगेश आणि त्याच्या चारही मित्रांची पाण्यात उतरून हुल्लडबाजी सुरू होती. पोहून झाल्यानंतर ते सगळे बाहेर आले, मात्र योगेश अंगाची माती धुण्यासाठी पुन्हा पाण्यात उतरला होता. त्यानंतर काही वेळाने तो मित्रांना दिसेनासा झाला.
पण बराच वेळ झाल्या नंतर पाण्यात उतरलेला योगेश मित्रांना दिसत नव्हता. त्यामुळे मित्रांनी आरडाओरड सुरू केली. तसेच ते मदतीचा हात मागू लागले. हा आरडाओरडा ऐकून जवळच असलेल्या पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशामन दल आणि हवेली पोलिसांनी मिळून योगेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृतदेह आता शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून हवेली पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
हेही वाचा - Gudipadwa 2022 : निर्बंधामुक्त गुढीपाडवा; सोनेखरेदीसाठी पुणेकरांनी केली गर्दी