ETV Bharat / city

Pune Mask Use Issue : देशात मास्क वापरण्याच्या बाबतीत पुणेकर 10 व्या क्रमांकावर; आत्तापर्यंत भरला 26 कोटींचा दंड - मास्क वापरण्यात पुणे १० व्या स्थानी

पुण्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणत वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अगदी शंभरीत असलेला रुग्णांचा आकडा काल ४००० च्या वर गेला आणि ही आकडेवारी खरच धक्कादायक आहे. अशातच एका सर्वेक्षणानुसार पुण्यात तब्बल 29 टक्के नागरिक विना मास्क फिरत असल्याचे समोर आले आहे.

विना मास्क नागरिक
विना मास्क नागरिक
author img

By

Published : Jan 10, 2022, 5:23 PM IST

Updated : Jan 10, 2022, 5:39 PM IST

पुणे - मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले पाहायला मिळत आहे. मागील आठ दिवसांचा विचार केला तर कोरोना रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. पुण्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणत वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अगदी शंभरीत असलेला रुग्णांचा आकडा काल ४००० च्या वर गेला आणि ही आकडेवारी खरच धक्कादायक आहे. अशातच एका सर्वेक्षणानुसार पुण्यात तब्बल 29 टक्के नागरिक विना मास्क फिरत असल्याचे समोर आले आहे. तर देशात मास्क वापरणाऱ्यांच्या यादीत पुणे 10 क्रमांकावर असल्याचे पुढे आले आहे.

मास्क वापरबाबतचा आढावा घेतांना प्रतिनिधी
  • मास्क वापरण्यात पुणे १० व्या स्थानी

पुण्यात देखील प्रशासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. पण याउलट पुणेकर मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. कारण एका अहवालात मास्क घालण्यात पुणे १० व्या स्थानी असल्याचे सामोर आल आहे. डिजिटल इंडिया फाउंडेशनच्या अहवालानुसार पुणेकर मास्क वापरण्यात देशाच्या १० व्या स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालातून जी टक्केवारी सामोर आली आहे, ती देखील धक्कादायक आहे. पुण्यात तब्बल 29 टक्के नागरिक अजूनही मास्क न लावता फिरतात. पुण्यात 34 टक्के पुरुष मास्क परिधान करतात तर त्या मागोमाग 33 टक्के महिला कोविडच्या बचावासाठी मास्क लावतात, हे या अहवालातून समोर आले आहे.

  • पुणेकरांनी भरला २६ कोटींचा दंड

मास्क वापरताना पुणेकर मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा करतांना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे प्रशासन मात्र अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलताना दिसत आहे. कोरोना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत पुणेकरांनी एकूण 26 कोटी रुपयांचा दंड भरला आहे. प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्या ५ लाख ३८ हजार पुणेकरांना दंड ठोठावला आहे. आता देखील मास्क न वापरणाऱ्या पुणेकरांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

  • प्रशासनाचे अवाहन

दरम्यान राज्याचे उपुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मास्क न घाण्याऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्याचबरोबर प्रशासन वारंवार पुणेकरांना मास्क घालण्याचे आवाहन करत आहे, मात्र पुणेकर निष्काळजीपणे फिरताना दिसत आहेत.

हेही वाचा - Corona Restrictions In Maharashtra : मंत्रालयाचा कारभार पुन्हा ५० टक्क्यांवर, दोन शिफ्टमध्ये होणार कामकाज

Last Updated : Jan 10, 2022, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.