ETV Bharat / city

पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; 9 तरुणींची सुटका - Prostitution

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कोरेगाव पार्क येथील दोन सेंटरवर पुणे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी वेश्या व्यवसाय करण्यासाठी जमलेल्या 9 तरुणीची सुटका केली. तर 2 स्पा मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. सर्व तरुणींची सुटका करण्यात आली असून सुरक्षिततेसाठी या तरुणींना महिला संरक्षणगृहात पाठविण्यात आले आहे.

File photo
File photo
author img

By

Published : May 6, 2021, 7:49 PM IST

पुणे - वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सध्या लॉकडाऊन आहे. परंतु लॉकडाऊनचे उल्लंघन करीत मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कोरेगाव पार्क येथील दोन सेंटरवर पुणे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी वेश्या व्यवसाय करण्यासाठी जमलेल्या 9 तरुणीची सुटका केली. तर 2 स्पा मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

शुभम प्रेमकुमार थापा (वय 22) आणि अफताबुद्दीन नुरुद्दीन (वय 27) या दोघांना अटक करण्यात आली. तर चांदबिबी रमजान मुजावर आणि अब्दुल असिफ हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कोरेगाव पार्क येथील उच्चभ्रू वस्ती असलेल्या परिसरात फेमिना स्पा आणि योगनिद्रा स्पा या दोन्ही ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक या स्पामध्ये पाठवले. तेव्हा त्यांना या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करून या दोन्ही स्पा वर छापा टाकला. यावेळी त्यांना वेश्याव्यवसाय करताना नऊ तरुणी आढळल्या. या सर्व तरुणींची सुटका करण्यात आली असून सुरक्षिततेसाठी या तरुणींना महिला संरक्षणगृहात पाठविण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.