पुणे: राज्यासह देशात कोरोना बाधित रुग्णांचा उद्रेक ( Outbreak of corona positive patients ) झाला आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात देखील चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. दररोज हजारोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण हे वाढताना दिसत आहे.अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 18 जानेवारीला पुणे येथे संभाव्य दौरा होणार होता ( PM Narendra Modi's visit to Pune on January 18 ). मात्र हा संभाव्य दौरा आता रद्द करण्यात आला ( Prime Minister Narendra Modi's visit to Pune canceled ) आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे प्रशासनाला देण्यात आली आहे.
असे होते दौऱ्याचे नियोजन -
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18 जानेवारीला पुणे येथे दौऱ्यावर येणार होते. या दोऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोचे उद्घाटन ( PM Narendra Modi inaugurates Pune Metro ) करणार होते. त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते होणार होते. तसेच दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या नावाने असलेल्या कलादालनाचे उद्घाटन करण्यात येणार होते. तसेच सिम्बायोसिस विद्यापाठीशी संबंधित कार्यक्रम, या कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क ( Contact the Divisional Commissioner's Office from the PMO ) साधण्यात आला आहे. त्यांच्याकडून पंतप्रधानांचा संभाव्य दौरा होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.