ETV Bharat / city

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा ठरला अ-राजकीय.. फक्त आणि फक्त कोरोना लसीवर चर्चा

author img

By

Published : Nov 29, 2020, 3:42 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कालचा पुणे दौरा पूर्दीणपणे अराजकीय ठरला. मोदींच्या स्वागताला भाजपचा कोणताही नेता उपस्थित नव्हता केवळ आपल्या सोशल मीडिया खात्यावर व्हर्च्युअल स्वागत करण्यात आले. मोदींनी केवळ कोव्हिशिल्ड लस निर्मितीप्रक्रियेचा आढावा घेतला.

Prime Minister Narendra Modi's   Pune tour totally non  political
पंतप्रधान मोदींचा पुणे सीरम दौरा

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पूर्णपणे अराजकीय ठरला आहे. फक्त आणि फक्त कोविड लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारच्या दौऱ्यात सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला, कार्यकारी संचालक नताशा पूनावाला यांच्याशी कोरोना लसीचे विकसन आणि उत्पादन यांच्या प्रक्रियेचा आढावा घेतला.

लस सर्वप्रथम भारतीयांना -

जानेवारीपासून दर महिन्याला कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसीच्या दहा कोटी लस तयार करण्यात येणार असून सर्वात आधी ही लस भारतीयांना देण्यात येईल, अशी ग्वाही सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला शनिवारी भेट देऊन निर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यानंतर पूनावाला यांनी कोरोना लसीबाबत अधिक माहिती दिली.

सीरम इन्स्टिट्यूटबाहेर कडक बंदोबस्त -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामुळे विमानतळ आणि मांजरी परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरातील दुकाने पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. तसेच या परिसरात येणाऱ्या नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. मात्र जेव्हा नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटला दाखल झाले तेव्हा त्या परिसरातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी गर्दी केली होती. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना काही नागरिकांवर लाठीही चालवावी लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून स्वागत -

कोविड कवी लसीचे माहिती घेण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर विभागीय आयुक्त पोलीस महासंचालक जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते एकही राजकीय नेता यावेळी उपस्थित नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौरामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, खासदार, आमदार यापैकी कोणीही स्वागताला येऊ नये, असे कळविण्यात आले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून कोणीही नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला उपस्थित नव्हते.

नो बॅनरबाजी फक्त व्हर्च्युअल स्वागत -

यापूर्वी नरेंद्र मोदी पुण्यात आले होते तेव्हा त्यांच्या भोवती राजकीय नेत्यांची मांदियाळी होती. परंतु शनिवारचा हा दौरा पूर्णपणे अराजकीय ठरला. विशेष बाब म्हणजे शहरात कुठेही पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे राजकीय बॅनर लावण्यात आलेले नव्हते किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे बॅनरही लावण्यात आलेले नव्हते. फक्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून आपआपल्या सोशल मीडियावर व्हर्च्युअल स्वागत करण्यात आले तसेच काही पदाधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे जुने छायाचित्र वापरुन ते पोस्ट करून नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

म्हणून राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात अगदी कमी कालावधीसाठी सीरम संस्थेला भेट देणार असून लगेच परत येणार असल्याने राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान कार्यालयाकडून कळवण्यात आले होते. या सूचनेमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदी यांच्या पुण्यातील दौर्‍यात उपस्थित राहिले नाहीत.

आसाराम बापूंना सोडा यासाठी निदर्शने -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामुळे विमानतळ आणि मांजरी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरातील दुकाने, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटबाहेर आसाराम बापू यांना त्वरित सुटका करावी, या मागणीसाठी दोन लोकांनी निदर्शने केली त्यांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.