पुणे - नाशिक येथे होणाऱ्या आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि गुलझार यांची नावे चर्चेत असताना ब्राम्हण महासंघाने मात्र या दोघांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी जावेद अख्तर आणि गुलझार यांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा - आता मराठा समाजाने आर्थिक निकषावरील आरक्षणासाठी पाठपुरावा करावा - ब्राम्हण महासंघ
'कोणता संदेश देऊ पाहत आहेत?'
साहित्यक्षेत्रात योगदान देणारे अनेक दिग्गज आज महाराष्ट्रात उपलब्ध असताना नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्यांना बोलावून साहित्य संमेलनाचे पदाधिकारी नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहेत, असा सवाल ब्राम्हण महासंघाने उपस्थित केला आहे. जावेद अख्तर यांचे मराठी साहित्यात योगदान काय, असा सवाल यावेळी दवे यांनी केला आहे.