ETV Bharat / city

International Women's Day : 100 किलो 'रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चर'ची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दखल

पुण्यातील प्राची देब यांच्या 100 किलो रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चरची ( Prachi Deb 100 Kg Royal Icing Structure ) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली ( Word Book Of Record ) आहे. पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब यांची कलाकृती नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरते आहे.

रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चर
रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चर
author img

By

Published : Mar 7, 2022, 10:28 PM IST

पुणे - लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे केक. वाढदिवस असो अथवा कोणतेही चांगले कार्य केक कापल्याशिवाय सेलिब्रेशन होतच नाही. असे केक बनवण्याचा मोठा व्यवसाय आहे. त्यात पुण्यातील प्राची देव यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता प्राची देब यांच्या 100 किलो रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चरची ( Prachi Deb 100 Kg Royal Icing Structure ) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली ( Word Book Of Record ) आहे. आर्टिसनल केक, कपकेक, कुकीज किंवा कस्टमाइझ्ड थीम केक बेकिंग असो, पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब यांची कलाकृती नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरते आहे.

प्राचीने खाद्य संरचनेतून मिलन कॅथेड्रेल स्मारक साकारले आहे. या स्मारकाची लांबी 6 फूट 4 इंच, उंची 4 फूट 6 इंच आणि रुंदी 3 फूट 10 इंच आहे. कॅथेड्रलचे स्मारक करण्यासाठी सुमारे 1,500 तुकड्यांची आवश्‍यकता असल्याने नियोजन आणि तयारीला बराच वेळ लागला. प्राची यांनी एकट्याने प्रत्येक तुकडा तयार केला आणि नंतर ते तुकडे एकत्र करण्यास त्यांना सुमारे एक महिना लागला आहे.

प्राची देब यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

100 किलो केक पूर्ण शाकाहारी

या कॅथेड्रल संरचनेचे प्रत्येक पैलू योग्यरित्या मिळवणे हे निश्‍चितच एक आव्हानात्मक काम होते. रॉयल आयसिंगच्या पारंपारिक रेसिपीमध्ये अंडी असतात. परंतु, भारतीय बाजारपेठेची मागणी घेता, प्राचीने अंड्याचा वापर न करता, पूर्णत: शाकाहारी उत्पादन 'व्हेगन रॉयल आयसिंग' तयार केलं आहे. सुगारिना या कंपनीच्या सहाकार्याने प्राचीने हा केक बनवला आहे.

रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चर
रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चर

स्वतः वर विश्वास ठेवा आणि आपले ध्येय साध्य करा

प्राची देब बोलताना म्हणाली की, स्वतः वर विश्वास ठेवला तर आपण प्रत्येक जण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. महिला दिनाच्या निमित्ताने ( International Women's Day ) प्रत्येकाने आपल्यावर विश्वास ठेवावा. जेवढे शक्य होईल तेवढ्या जास्त प्रमाणात मेहनत घ्यावी, असा संदेशही देब यांनी महिला दिनाच्या निमित्ताने दिला आहे.

रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चर
रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चर

केकच्या माध्यमातून विविध प्रतिकृती

प्राचीने जगप्रसिद्ध केक आयकॉन सर एडी स्पेन्स एमबीई यांच्या मार्गदर्शनाखाली रॉयल आयसिंग या किचकट कलेबाबतचे शिक्षण घेतले. त्यानंतर 2014 साली 3-4 इंच उंच खाण्यायोग्य रॉयल आयसिंग गॅझेबो वापरण्याचा प्रयत्न केला. तर, 2019 साली तयार करण्यात आलेली 3.9 फूट रॉयल आयसिंग रचना ही त्यापैकीच एक होती. मात्र, नुकत्याच तयार केलेल्या मिलान कॅथेड्रल या संरचनेची जगभरातून दखल घेण्यात आली. रॉयल आयसिंग कलेचा प्रचार करणे. तसेच, केक आणि बेकिंग उद्योगात या कलेला अधिक स्थान निर्माण करण्यात मदत करणे ही माझी मुख्य महत्त्वाकांक्षा आहे, असे प्राची देबने सांगितले.

हेही वाचा - Transgender Wedding In Beed : अनोखा विवाह, तृतीयपंथी सपना आणि बाळू अडकले विवाहबंधनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.