ETV Bharat / city

Sunflower Oil Rate Hike : युक्रेन आणि रशियावरून सुर्यफुल तेलाची होणारी निर्यात थांबली- पुना मर्चंट

पुना मर्चंट चेंबरचे संचालक ( Poona Merchants Chamber ) कन्हैय्यालाल गुजराती ( Kanhaiya Lal Gujrathi  ) म्हणाले, की गेल्या काही महिन्यांत सुर्यफुलाच्या तेलाची ( sunflower oil ) किंमत प्रति 15 किलो 300 ते 400 रुपये किलोने वाढली आहे. युक्रेन आणि रशियावरून सुर्यफुल तेलाची निर्यात थांबल्याचे गुजराती यांनी सांगितले आहे.

Sunflower Oil Rate
Sunflower Oil Rate
author img

By

Published : Mar 14, 2022, 8:23 PM IST

पुणे- युक्रेन आणि रशियातील युद्धाचे ( Russia Ukraine war ) परिणाम थेट स्वयंपाकापर्यंत दिसणार आहेत. याबाबतची माहिती पुना मर्चंट चेंबरचे संचालक कन्हैयालाल गुजराथी यांनी दिली आहे.

पुना मर्चंट चेंबरचे संचालक ( Poona Merchants Chamber ) कन्हैय्यालाल गुजराती ( Kanhaiya Lal Gujrathi ) म्हणाले, की गेल्या काही महिन्यांत सुर्यफुलाच्या तेलाची ( sunflower oil ) किंमत प्रति 15 किलो 300 ते 400 रुपये किलोने वाढली आहे. युक्रेन आणि रशियावरून सुर्यफुल तेलाची निर्यात थांबल्याचे गुजराती यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-Cat Show in Nagpur : अमेरिकन मेनकूनचा आकाराने तर बेंगॉली कॅटच्या रंगाने वेधले लक्ष

युद्धच संपेल तेव्हा खाद्यतेलाचे भाव कमी होतील-

जळगावच्या प्रसिद्ध अशा दाणा बाजारातही खाद्यतेलाचे दर वधारले आहेत. दहा ते बारा दिवसांत किलोमागे तेलाचे २५ ते २६ रुपये दर वाढले आहेत. तर १५ किलोमागे 12 दिवसांत तब्बल 400 रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर प्रति १५ किलोमागे २,७०० रुपये इतके झाले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. युद्धच संपेल तेव्हा खाद्यतेलाचे भाव पुन्हा कमी होतील, अशी अपेक्षा खाद्यतेलाचे विक्रेते यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा-Devendra Fadnavis Pendrive bomb : देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहात नवा पेन ड्राईव्ह बॉम्ब; 'वक्फ बोर्डाच्या सदस्याचा दाऊदशी संबंध'

गोरगरीब व सर्वसामान्यांनी कसे जगावे ?

सर्वसाधारपणे पंधरा किलो तेल खरेदी करणारे ग्राहक दोन ते तीन किलो तेल खरेदी करत आहेत. बजेट कोलमडल्यामुळे संसाराचा गाडा चालवावा, कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. अचानकपणे खाद्यतेलात वाढ झाल्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्यांनी जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खाद्यतेल प्रत्येक घरात आवश्यक असते. त्याशिवाय स्वयंपाकच होऊ शकत नाही. त्यामुळे खायचे काय ? याचा विचार सरकारने करायला पाहिजे.

हेही वाचा-Challenge To Mahavikas Aghadi : चार राज्यांनी आत्मविश्वास वाढवला भाजपच्या टार्गेटवर आता महाराष्ट्र

युक्रेन रशिया युद्धाचा आजचा 19 वा दिवस

युक्रेन रशिया युद्धाचा आजचा 19 वा दिवस आहे. (Russia Ukraine war) दरम्यान, आज पुन्हा एकदा युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये आज सोमवार दि. (14 मार्च)रोजी 10 :30 वाजता बोलणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी एक व्हिडीओच्या माध्यमातून मत मांडले आहे. त्यामध्ये त्यांनी रसिया नाटोवरही हल्ला करू शकतो असा इशारा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.