पुणे :- राज्यासह पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar Corona Meeting) पुणे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे (Pune Police Take Action against without mask men) आदेश दिले होते. पुणे पोलिसांच्यावतीने विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. शहरातील चौकात पुणे पोलिसांच्यावतीने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर 500 रु तर विना मास्क थुंकल्यास 1000 रु कारवाई करण्यात येत आहे.
पुणे पोलिसांच्यावतीने शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर चौका चौकात कारवाई होत असून नागरीकांनी नियमांचं पालन करावं याचं उद्दिष्टाने ही कारवाई करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने विना मास्क वापरणाऱ्या नागरिकांना फिरत असून, अशांना गांधीगिरी करत पोलीस मास्क देत आहे.