ETV Bharat / city

नूतन वर्ष हे अपघातमुक्त व्हावे; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या शुभेच्छा - Pimpri Chinchwad City Police

आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुभेच्छा पत्रात देण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहन चालकांना केले. नूतन वर्ष हे अपघात मुक्त व्हावे अशा शुभेच्छा सर्वांना दिल्या.

pcmc police
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या शुभेच्छा
author img

By

Published : Jan 3, 2021, 6:56 AM IST

पुणे - नववर्षाच्या स्वागताला पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी रस्त्यावर येऊन वाहनचालकांना वाहतूक शुभेच्छा पत्र दिले. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही वाहन चालकांना त्यांनी केले आहे. तसेच नूतन वर्ष हे अपघातमुक्त व्हावे अशा शुभेच्छा वाहनचालकांना दिल्या आहेत.

नूतन वर्ष हे अपघात मुक्त व्हावे...

रस्ता सुरक्षेबाबत वाहनचालकांना वाहतूक शुभेच्छापत्र देण्याबरोबच आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुभेच्छा पत्रात देण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहन चालकांना केले. नूतन वर्ष हे अपघात मुक्त व्हावे अशा शुभेच्छा सर्वांना दिल्या. वाहतूक शुभेच्छा पत्रामध्ये वाहन चालकांसाठी प्रतिज्ञा आणि वाहतुकीचे आदर्श नियम नमूद करण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या शुभेच्छा
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या शुभेच्छा
तसेच नववर्षानिमित्त स्मार्ट शहराच्या स्मार्ट नागरिकांनी वाहतूक नियम व सडक सभ्यतेचे पालन करण्याचा स्मार्ट संकल्प केला. सदरचा उपक्रम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत राबविण्यात येत असून, रस्तासुरक्षा व सडक सभ्यतेच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस व पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी यांचे संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा व सडक सभ्यतेबाबत स्मार्ट संकल्प हा ऑनलाइन उपक्रम सुरू करण्यात आला. या अधिकाऱ्यांनी घेतला सहभाग...यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, मा अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त वाहतूक डॉ. सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक श्रीकांत डीसले, पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.