पुणे - दारू आणि सिगारेटची मागणी करत पोलिसांच्या अंगावर थुंकणाऱ्याला पकडून पोलिसांनी त्याला चांगलाच काठ्यांचा प्रसाद दिला. पुण्यातील कोथरुड परिसरात ही घटना घडली. अमित कुमार (रा. बिहार) असे या तरुणाचे नाव आहे.
कोरोनाचा धसका: पुण्यात अंगावर थुंकणाऱ्याला पोलिसांनी लाठ्याकाठ्यांनी चोपले
आज सकाळी शेल्टरहोममधून अमित कुमार पळून गेल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून परत आत जाण्यास सांगत होते. परंतु आत न जाता तो पोलिसांनाच शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर थुंकला.
तरुणाला चोपताना पोलीस
पुणे - दारू आणि सिगारेटची मागणी करत पोलिसांच्या अंगावर थुंकणाऱ्याला पकडून पोलिसांनी त्याला चांगलाच काठ्यांचा प्रसाद दिला. पुण्यातील कोथरुड परिसरात ही घटना घडली. अमित कुमार (रा. बिहार) असे या तरुणाचे नाव आहे.
Last Updated : Apr 20, 2020, 4:36 PM IST