ETV Bharat / city

पुणेकरांसाठी खूशखबर... आजपासून बससेवा सुरू! - public transport in pune

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 190 मार्गांवर आता 421 बसेस धावणार आहेत. तिकीटात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. योग्य ती खबरदारी घेऊन पीएमपीएमएल सुरू करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी दिली आहे.

pune city transport
पुणेकरांसाठी खूशखबर...आजपासून बससेवा सुरू!
author img

By

Published : Sep 3, 2020, 1:05 PM IST

पुणे - कोरोनाच्या संकटामुळे मागील 5 महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएल सेवा आजपासून सुरू झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 190 मार्गांवर आता 421 बसेस धावणार आहेत. तिकीटात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. योग्य ती खबरदारी घेऊन पीएमपीएमएल सुरू करण्यात आली आहे.

पुणेकरांसाठी खूशखबर...आजपासून बससेवा सुरू!

स्वारगेट, पुणे मनपा, शिवाजीनगर, हडपसर, पुणे स्टेशन, हडपसरसारख्या गर्दीच्या मार्गांवर सकाळी आणि सायंकाळी शटल सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी 120 जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी दोनशे बस आधीपासूनच मार्गावर धावत होत्या. उर्वरित दोनशे, अडीचशे बसचा ताफा सेवेसाठी तयार करण्यात आला आहे. बसमध्ये एकावेळी 17 किंवा 20 प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. महिला व पुरुष प्रवाशांचे यात नियोजन करण्यात आले आहे.

65 वर्षांपुढील ज्येष्ठ आणि 10 वर्षांच्या आतील मुलांना बसमध्ये प्रवास करता येणार नाही. बसमध्ये मास्क लावूनच बसावे. तसेच कॉइन बॉक्स देखील ठेवण्यात आला आहे. सोशल डिस्टनसिंगसाठी सीटवर मार्किंग करण्यात आल्याची माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी दिली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मागील 5 महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएल सेवा आजपासून सुरू झाली आहे.

दरम्यान, सुट्टीवर असणाऱ्या सेवकांना आता काम मिळणार आहे. गेल्या 5 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना काम नव्हते. त्यांना वेतन मिळत नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. जवळपास 200 कर्मचाऱ्यांना पुन्हा रोजगार सुरू होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.