ETV Bharat / city

ब्रेक फेल झाल्याने पीएमपीएमएल बस हॉटेलमध्ये घुसली; लाखोंचे नुकसान - अपघात

बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाने बस थांबवताना हा प्रकार घडला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पीएमपीएमएल बस अपघात
author img

By

Published : May 17, 2019, 5:37 PM IST

पुणे - शहरातील वडगाव बुद्रुक येथील हॉटेलमध्ये पीएमपीएमएलची बस घुसल्याची घटना घडली आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाने बस थांबवताना हा प्रकार घडला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पीएमपीएमएल बस अपघात

सिंहगड कॉलेजकडून स्वारगेटकडे बस (एमएच-१२ एफसी-९४३५) जात होती. कॉलेजच्या उतारावरुन खाली जात असताना बसचा ब्रेक निकामी झाला असल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी बसमध्ये चालक, वाहक आणि इतर २ ते ३ प्रवासी होते. चालकाने बस थांबवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडकवली. परंतु, बस वेगात असल्याने कठड्याला धडकून सिंहगड फाउंटेनमध्ये हॉटेलमध्ये घुसली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या अपघातात हॉटेल सिंहगड फाऊंटेनचे साधारण २ लाख १० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, अशी तक्रार हॉटेल मालकाने दिली आहे. याआधीही पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक निकामी होवून अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नादुरुस्त बस रस्त्यावर कशा धावतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Intro:mh pun 02 bus ramped in hotel av 2019 7201348Body:mh pun 02 bus ramped in hotel av 2019 7201348

anchor
पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील हॉटेलमध्ये पीएमपीएमएलची बस घुसली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज जवळील वडगाव पोलिस चौक शेजारील ,सिंहगड फाउंटन हॉटेल मध्ये सिंहगड कॉलेज कडून स्वारगेट कडे जाणाऱ्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने बस हॉटेल सिंहगड फाऊंटन मध्ये घुसली.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी बस मध्ये चालक आणि वाहक आणि इतर दोन ते तीन प्रवाशी बस मध्ये होते या अपघातात हॉटेल सिंहगड फाऊंटनचे साधारण 2 लाख 10 हजार रुपयांची आर्थिक नुकसान झाली असल्याची तक्रार हॉटेल मालकाने दिली आहे. सिंहगड कॉलेज बस थांब्यावरून बस(एमएच-१२.एफसी.९४३५) घेऊन स्वारगेटकडे जात असताना कॉलेजच्या उतारावरून खाली येत असताना ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कठड्याला धडकावली. परंतु, बस उतारावरून वेगाने आल्याने कठड्याला धडकून हॉटेलमध्ये शिरली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.