ETV Bharat / city

पुण्यातील नरेंद्र मोदींच्या 'त्या' मंदिरातील मूर्ती रातोरात हलवली - मोदींची मूर्ती काढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी जे काही करत आहेत, ते खरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे अशा महापुरुषांचे शिल्प का उभारले जाऊ नये, अशी भावना नागरिकांची आहे. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना भावते. ते भारताचे खरे हिरो आहेत, अशी नागरिकांची भावना असल्याचेही मोदींचे मंदिर बांधलेल्या कार्यकर्त्याचे मत होते. मात्र आता या मंदिरातून मूर्ती हलवण्यात आली आहे.

नरेंद्र मोदींच्या 'त्या' मंदिरातील मूर्ती रातोरात हलवली

author img

By

Published : Aug 19, 2021, 9:33 AM IST

पुणे - पुण्यातील औंध परिसरात मयूर मुंडे नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले होते. परंतु आता मात्र या मंदिरातील मोदींची मूर्ती इतर ठिकाणी हलवली असल्याची माहिती समोर येत आहे. रात्रीतून ही मूर्ती दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली आहे..ही मूर्ती एका नगरसेवकाच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे.

'मोदींचे व्यक्तिमत्व सर्वांना भावते' -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे, अशा व्यक्तिमत्त्वाचे मंदिर नक्कीच समाजातील व्यक्तीला प्रेरणा देणारे आहे. समाजात राहताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधावे, असे मला वाटले, अशी प्रतिक्रिया मयूर मुंडे यांनी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी जे काही करत आहेत, ते खरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे अशा महापुरुषांचे शिल्प का उभारले जाऊ नये, अशी भावना नागरिकांची आहे. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना भावते. ते भारताचे खरे हिरो आहेत, अशी नागरिकांची भावना असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान आता या मंदिरातील मूर्ती दुसऱ्या ठिकाणी हलवली असल्याची माहिती समोर येत आहे. या मागचे कारण अद्याप समजले नाही.

तर चेन्नईच्या त्रिचीमध्ये एका शेतकऱ्यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले होते. या शेतकऱ्याने आपल्या स्वत:च्या पैशाने हे मंदिर तयार केले होते. ज्या जमिनीवर शेतकऱ्याने हे मंदिर तयार केले. ती जमिनही शेतकऱ्याची होती.

हेही वाचे - नमो फाऊंडेशनच्यावतीने पुण्यात बांधण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.