पुणे - सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणत प्रि-वेडिंगचा क्रेझ ( Pre Wedding Shoot ) असून अनेक तरुण तरुणी लग्नाच्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आठवण म्हणून शूट करत असतात. सध्या हे प्रमाण तरुणांमध्ये वाढतच चालला आहे. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांमध्येही याची ( Senior Citizen Pre Wedding Shoot ) क्रेझ वाढली आहे. आज अनेक ज्येष्ठ नागरिक हे पोस्ट मॅरेज शूटिंग करत आहेत. पुण्यातील गुरुवार पेठ येथे राहणारे सुभाष थोरवे आणि अल्का थोरवे या दोन्ही ज्येष्ठ जोडप्याने असच पोस्ट मॅरेज शूटिंग केलं आहे. या जोडप्याने फक्त भारतातील नव्हे, तर भारताबाहेर ही जाऊन वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन या जोडप्याने शूटिंग केली आहे.
भारताबाहेर जाऊन केलं शूट - आज तरुण तरुणींमध्ये विविध रिल्स, शूटिंग, तसेच लग्नाआधी त्यानंतर गरोदरपणात शूट अस वेगवेगळ्या शूटचा क्रेझ हा वाढत चालला आहे. तरुणांचे हे व्हिडिओ बघून आज अनेक सुपरस्टार झालेले आहे. अश्यातच ज्येष्ठ नागरिकांमध्येही याची क्रेझ वाढू लागली आहे. अश्यातच पुण्यातील या जोडप्यानेदेखील विविध ठिकाणी जाऊन शूट, रीलस केलं आहे.
प्रेम म्हणजे प्रेम असत - आमच्या वयात असे प्रि विडींग शूट नव्हत. व्हिडिओ बनवायचं काय हे कोणालाही माहित नव्हते. तेव्हा फक्त आणि फक्त ब्लॅक अँड व्हाईट फोटे होते. पण आज तरुणाची किंवा घरातीलच नात्वडणांची व्हिडिओ बघून आम्हाला ही वाटल की आम्ही ही ज्येष्ठ झालो तरी काय, प्रेमाला वय नसत. असे म्हणत शूट करायचं ठरवलं आणि आज आम्ही विविध ठिकाणी जाऊन आमचं पोस्ट वेडिंग शूट केलं आहे. अस यावेळी सुभाष थोरवे याने सांगितले.
घरच्या सुनांनी दिलं प्रोत्साहन - वय झालं असल तरी घरच्यांना वाटत की आम्ही बाहेर फिरायला जाव. चांगल राहणीमान करावं आणि मग आम्ही ठरवलं की कुठेतरी जाऊन शूट करावं आणि पाहिलं शूट हे लंडन येथे जाऊन केलं. या वयात अस शूट करताना थोडी धाकधूक होती. पण म्हणतात ना प्रेमाला वय नसत तस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शूट करायला लागलो, असे देखील यावेळी अल्का थोरवे यांनी सांगितले.
हेही वाचा - MLC Election Candidate : सर्व पक्षांकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोण कोण लढणार