पुणे - धायरी येथील एका मंडप व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (19 जून) पहाटेच्या सुमारास घडली. स्वप्निल उत्तम रायकर (वय 45) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्वप्नील रायकर यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून हा व्यवसाय ठप्प आहे. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी स्वयंपाक घरातील छताच्या हुकला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मानसिक ताण तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान पुण्यातीलच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार आज पहाटेच उघडकीस आला. ओळखपत्र तयार करण्याचे काम करणाऱ्या अतुल शिंदे यांनी मुलांना गळफास देऊन पती-पत्नीने गळफास घेतला. लॉकडाऊन सुरू असल्याने अतुल शिंदे यांचा व्यवसाय बंद होता. त्यामुळे आर्थिक हलाखीमुळे या कुटुंबाने जीवन संपवले की इतर काही कारणे होती, याचा तपास पोलीस करत आहेत.
पुण्यात गळफास घेऊन मंडप व्यावसायिकाने संपवले जीवन - पुणे आत्महत्या न्यूज
मृत स्वप्नील रायकर हे मंडप व्यावसायिक होते. गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प असल्याने ते तणावात होते. याच आर्थिक तणावातून त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.