पिंपरी-चिंचवड - शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले असून, त्यामधून १२ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मावळ परिसर व पवना धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने धरण दुसऱ्यांदा भरले आहे.
मागील २४ तासात पवना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये १०६ मिमी पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या मोसमात विक्रमी ३३३७ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 'ओव्हर फ्लो' झाले आहे. नदी काठच्या गावांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला असून, ग्रामस्थांना दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा कोयनेचे दरवाजे आठ फुटांनी उघडले, धरणातून ७३ हजार ०६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग