ETV Bharat / city

Parsi New Years 2022 असा साजरा केला जातो पारशी नववर्ष दिवस जाणून घ्या इतिहास - नवरोझ

जगभरातील विविध धर्मियांचे नवीन वर्ष हे त्यांच्या त्यांच्या रीतिरिवाज नुसार साजरा केले जाते इंग्रजी नवीन वर्ष जरी 1जानेवारीला सुरू होत असले तरी विविध धर्मियांचे नवीन वर्ष हे त्या त्या धर्मानुसार साजरे केले जाते 16 ऑगस्ट रोजी पारशी नूतन वर्षाची Parsi New Years सुरुवात होत आहे जुन्या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाचा आरंभ असे दोन दिवस पारशी लोक Parsi people साजरे करतात पारशी वर्षाचा शेवटचा दिवस आणि नूतन वर्षाचा आधीचा दिवस पतेती Pateti Festival असते तर पारशी वर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ Navroz म्हणून ओळखला जातो

Parsi New Years Day
पारशी नववर्ष दिन
author img

By

Published : Aug 16, 2022, 12:40 AM IST

पुणे जगभरातील विविध धर्मियांचे नवीन वर्ष हे त्यांच्या त्यांच्या रीतिरिवाज नुसार साजरा केले जाते. इंग्रजी नवीन वर्ष जरी 1जानेवारीला सुरू होत असले तरी विविध धर्मियांचे नवीन वर्ष हे त्या त्या धर्मानुसार साजरे केले जाते. 16 ऑगस्ट रोजी पारशी नूतन वर्षाची Parsi New Years सुरुवात होत आहे. जुन्या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाचा आरंभ असे दोन दिवस पारशी लोक Parsi people साजरे करतात पारशी वर्षाचा शेवटचा दिवस आणि नूतन वर्षाचा आधीचा दिवस पतेती Pateti Festival असते तर पारशी वर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ Navroz म्हणून ओळखला जातो.

असा साजरा केला जातो पारशी नववर्ष दिन

प्रार्थना तसेच वेगळे वेगळे नाटक खेळ विविध साजरे केले जातात पुण्यातील सर जमशेटजी जेजीभाई अग्यायरीचे हाय प्रेस्ती कईपेशन यांनी सांगितले की पारशी समाज हा अग्निपूजक आहे आणि यासाठीच समाजाचे मंदिर म्हणजेच अग्यारी येथे अग्नीची पूजा केली जाते. पारशी नव वर्ष हे ऑगस्टमध्ये सुरू होते. यामध्ये आधीच्या वर्षाच्या शेवटचे दहा दिवस हे आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आपल्या झालेल्या चुकांची माफी मागण्यासाठी पारशी लोकांच्या मध्ये महत्त्वाचे मानले जातात. यामध्ये त्यातील दहाव्या शेवटच्या दिवशी अनेक पारशी नागरिक आपल्या जवळील अग्यायरीला भेट देतात. तिथे आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. हा दिवस पतेती म्हणून ओळखला जातो.आणि यंदाही पुण्यातील कॅम्प येथील सर जमशेटजी जेजीभाई अग्यायरी येथे मोठ्या संख्येने पारशी समाजातील नागरिक हे एकत्र येत पतेती साजरी करतात.आणि त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे पारसी नव वर्ष. या दिवशी सर्व लोक एकमेकांना भेटतात व आनंदाने हा दिवस साजरा करतात. यावेळी प्रार्थना तसेच वेगळे वेगळे नाटक खेळ विविध आनंदोत्सव या दिवशी साजरे केले जातात.

भारतात शहेनशाही कॅलेंडरनुसार होते नववर्षाची सुरुवात भारतात पारशी हा अत्यंत लहान समुदाय आहे. हा समुदाय शहेनशाही फसली आणि कदिमी अशा तीन विभागात विभागला आहे. भारतातील पारशी लोक शहेनशाही कॅलेंडर नुसार नववर्ष साजरे करतात. त्यामुळे भारतात पारशी नववर्ष हे ऑगस्ट महिन्यात साजरे केले जाते. फरवर्दीन महिन्याचा पहिला दिवस हा पारसी नवनवर्षाचा पहिला दिवस असतो आणि तो नवरोज म्हणून साजरा केला जातो. ही सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे. असा नवरोझचा अर्थ होतो. ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना केली जाते आणि खास पारशी भोजनाचा आस्वाद घेतला जातो.

पतेती आणि नवरोझ पारशी समजात पतेतीच्या दिवशी पारशी लोक गेल्या वर्षभरात झालेल्या चूकांची आणि गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चातापाचा दिवस म्हणून साजरा करतात. तर पारशी समाजाचं नवं वर्षाचा पहिला दिवस नवरोझ असतो. नवरोझच्या दिवशी पारशी लोक त्यांच्या धार्मिकस्थळाला भेट देऊन तेथे प्रार्थना करतात. तसेच एकमेकांना गळाभेटी देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देतात. नातेवाईक आप्तस्वकीय आणि मित्र मैत्रिणींना भेटतात. या उत्सवाच्या निमित्ताने दान धर्म करण्याची देखील पारशी समाजात परंपरा आहे.

अशी झाली सुरवात झोरोस्टेरियन समुदायाच्या श्रद्धेनुसार 3000 वर्षांपूर्वी या दिवशी साह जमशेद इराणच्या सिंहासनावर बसला होता. पारसी समाजातील लोकांनी त्याचा जलाभिषेक करुन त्याला सिंहासनावर बसवले होते. जमशेद यांनीच सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली होती. तेव्हापासून पारसी समाजातील लोकांनी पतेती दिवस साजरा करण्यास सुरवात केली. पारशी समाजातील लोक दरवर्षी पतेती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा करण्याचा असतो.

पारंपारिक पदार्थ एकमेकांना देऊन या दिवशी आनंद व्यक्त केला जातो गेल्या अनेक शतकापासून भारतामध्ये पारशी समाज वास्तव्य करत आहे. असे म्हणतात की भारतीय समाजामध्ये पारशी समाज हा साखरेसारखा गोड विरघळून गेलेला आहे. आणि त्यांची आपल्या भारताप्रतीचीची आत्मीयता वाखण्याजोगी असते.पारशी नववर्षाच्या दिवशी लोकांचे पारंपारिक पदार्थ एकमेकांना देऊन या दिवशी आनंद व्यक्त केला जातो. येथे अग्यारीमध्ये यज्ञ असतो त्या यज्ञाची पूजा केली जाते. हा यज्ञ 24 तास सुरू ठेवण्याची जबाबदारी येथील अग्यारीचे पुजारी म्हणजे प्रेस्टीज यांची असते. पुण्यातील सर जमशेटजी जेजीभाई अग्यायरी हे कॅम्प परिसरात 1844 साली बांधण्यात आल आहे. इथ तेव्हा पासून पारशी लोक हे नित्य नियमाने प्रार्थनेसाठी येत असतात तसेच पतेती आणि नवीन वर्षाच्या कार्यक्रम देखील या अग्यारीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.

हेही वाचा Independence Day संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.