ETV Bharat / city

सरकारने लवकरात लवकर आमच्या मुलांना सुखरूप मायदेशी आणावे; युक्रेनमध्ये अडकलेल्या सपना पठारेच्या आईची हाक - आमच्या मुलांना सुखरूप मायदेशी आणावे

युक्रेनमधील खारक्यू येथे परिस्थिती खूप बिकट झाली आहे. आमच्या मुलांना हॉस्टेलमधील अंडरग्राउंड येथे ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांना गेल्या दोन दिवसांपासून हल्लाचे आवाज येत असून मुलांमध्ये खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमचे सरकारला आवाहन आहे, की लवकरात लवकर मुलांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सविता पठारे यांनी केली आहे.

सविता पठारे
सविता पठारे
author img

By

Published : Mar 1, 2022, 5:38 PM IST

Updated : Mar 1, 2022, 5:48 PM IST

पुणे - रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी असून त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील 77 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले असून यातील सपना पठारे ही देखील खारक्यूमध्ये अडकली आहे. भारत सरकारने आमच्या मुलांना मायदेशी आणण्यासाठी तातडीने पावले उचलावित, अशी भावना सपना पठारेच्या आई सविता पठारेंनी व्यक्त केली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या पुण्यातील विद्यार्थीनीच्या आईसोबत संवाद साधनताना प्रतिनिधी
युक्रेनमधील खारक्यू येथे परिस्थिती खूप बिकट झाली आहे. आमच्या मुलांना हॉस्टेलमधील अंडरग्राउंड येथे ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांना गेल्या दोन दिवसांपासून हल्लाचे आवाज येत असून मुलांमध्ये खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमचे सरकारला आवाहन आहे, की लवकरात लवकर मुलांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सविता पठारे यांनी केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून मुलांच्या मनात खूप भीती असून जेवण ही व्यवस्थित मिळत नाही आहे. जास्तीत जास्त दोन मिनिटे बोलणे होत आहे. अंडरग्राउंड असल्याने जर फोन बंद असला तर खूप चिंता वाटते. तेथील परिस्थिती ही खूप बिकट असल्याने आम्हाला चिंता वाटत आहे. जेवढे मुलं तिथे अडकले आहेत, तेवढे मुलं ही सुखरूप परत यायला पाहिजे. यासाठी सरकारने लवकरात लवकर प्रयत्न केले पाहिजे, असे देखील यावेळी सविता पठारे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Russia-Ukraine Crisis : रशियाने व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा युक्रेनचा आरोप

Last Updated : Mar 1, 2022, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.