पुणे - 'गगन सदन तेजोमय', 'नदीला पूर आलेला', 'जांभूळ पिकल्या झाडाखाली', 'भय इथले संपत नाही', 'केंव्हा तरी पहाटे' 'लग जा गले', 'माझे राणी माझे मोगा', 'आयेगा आनेवाला' या आणि अशा सदाबहार गीतांनी सजलेल्या 'हृदय संगीत'मधून श्रोत्यांना शांतरसाची अनुभूती मिळाली. तब्बल वर्षभरानंतर झालेल्या या कार्यक्रमातून हृदयस्पर्शी भाव पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या मैफलीतुन रसिकांनी अनुभवले. 'लॉकडाऊन'नंतर झालेल्या या पहिल्याच कार्यक्रमात प्रेक्षागृह 'हाऊसफुल' झाल्याचे पाहून खुद्द पंडित हृदयनाथ मंगेशकरही भारावले आणि त्यांनी रसिकांना टाळ्या वाजवून अभिवादन केले.
निमित्त होते, पृथ्वीराज थिएटर्स आयोजित, मनिषा निश्चल्स महक निर्मित व प्रस्तुत 'हृदय संगीत' या विशेष कार्यक्रमाचे. पिंपरी-चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल आणि वंडरबॉय पृथ्वीराज यांच्या सुरेल गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. 'गगन सदन तेजोमय' या गीताने कार्यक्रमाची सुरवात करत पंडितजींनी कोरोनाचा अंधःकार संपून नवी पहाट होत असल्याचा भाव प्रकट केला. प्रत्येक गाण्याचा प्रवास, त्यामागच्या आठवणी सांगताना पंडितजींनी रसिकांच्या हृदयाला साद घातली. वंडरबॉय पृथ्वीराजच्या 'नको देवराया अंत आता पाहू' आणि 'जिवा-शिवाची बैलजोड' या गीतांनी रसिकांची मने जिंकली.
पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा 'हृदय संगीत' हाऊसफुल्ल
तब्बल वर्षभरानंतर झालेल्या 'हृदय संगीत' कार्यक्रमातून हृदयस्पर्शी भाव पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या मैफलीतुन रसिकांनी अनुभवले. 'लॉकडाऊन'नंतर झालेल्या या पहिल्याच कार्यक्रमात प्रेक्षागृह 'हाऊसफुल' झाल्याचे पाहून खुद्द पंडित हृदयनाथ मंगेशकरही भारावले आणि त्यांनी रसिकांना टाळ्या वाजवून अभिवादन केले.